AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन चालले होते, पण पिकअप गाडी काळ बनून आली अन्…

जुन्नर तालुक्यातील संतोष शिंदे हे संगनमेरजवळ ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन चालले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेत होते. सर्व्हिस सेंटरला पोहचण्याआधीच वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली.

ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन चालले होते, पण पिकअप गाडी काळ बनून आली अन्...
पिकअप वाहनाची ट्रॅक्टरला धडकImage Credit source: TV9
| Updated on: Apr 13, 2023 | 6:51 PM
Share

अहमदनगर / मनोज गाडेकर : संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे गावच्या हद्दीत पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर त्याठिकाणाहून पायी जाणारी तीन शाळकरी मुले जखमी झाली आहेत. संतोष नारायण शिंदे असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. अपघातात जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पिकअप चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

पिकअपने ट्रॅक्टरला धडक दिली

जुन्नर येथील संतोष नारायण शिंदे हे ट्रॅक्टर सर्व्हिसिंगसाठी आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाला जोराची धडक दिली. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन ट्रॅक्टरचालक संतोष नारायण शिंदे हे जागीच ठार झाले.

अपघातात एक ठार, तीन जखमी

याच दरम्यान त्या ठिकाणाहून जाणार्‍या तीन शाळकरी मुलांनाही धडक बसली. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून जखमी शाळकरी मुलांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. संतोष शिंदे यांचा मृतदेह कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.

डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर महामार्गावरून बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.