पीएम किसान समृद्धी केंद्रांचे उद्या लोकार्पण, सर्व सुविधा मिळणार एका छताखाली

नवीन तंत्रज्ञान विषयावर आधारित शेती विषयक माहितीची आदान-प्रदान या सुविधा केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षितता, दळणवळणाचा पुरेशा सोयीसुविधा आदी बाबी लक्षात घेतल्या जातील.

पीएम किसान समृद्धी केंद्रांचे उद्या लोकार्पण, सर्व सुविधा मिळणार एका छताखाली
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 7:56 AM

परभणी : राजस्थान येथील सिकोर येथून देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत. त्यात परभणी जिल्ह्यात ही 314 प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. भारतीय जनता पाटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी आज परभणीत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. शेतकर्‍यांच्या सर्व गरजांसाठी एकाच जागी उपाययोजना देण्यासाठी ही केंद्रे विकसित केली जात आहेत.

कृषी संबंधित साधने (खते, बियाणे, अवजारे) यांच्या माहितीपासून ते माती, बियाणे आणि खतांच्या चाचणी सुविधांपर्यंत, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. पीएम किसान समृद्धी केंद्रे ही शेतकर्‍यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल, अशी अपेक्षा यावेळी बोलून दाखवण्यात आली.

या सुविधा मिळणार पीएम किसान केंद्रात

नवीन तंत्रज्ञान विषयावर आधारित शेती विषयक माहितीची आदान-प्रदान या सुविधा केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षितता, दळणवळणाचा पुरेशा सोयीसुविधा आदी बाबी लक्षात घेतल्या जातील. यापुढे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रश्नांवर एकाच ठिकाणाहून उत्तर मिळवता येईल. शेतकर्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. येथून शेतकर्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. एकाच छताखाली वाजवी किंमतीमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, आदी दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करुन दिल्या जातील.

शासकीय योजनांची माहिती मिळेल

मृदा, बियाणे, खते, चाचणी सुविधा शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाधिष्ठित आणि परिपूर्ण सुविधा केंद्रांशी संलग्नीत केल्या जातील. लहान आणि मोठ्या शेती अवजारांची उपलब्धतता अथवा कस्टम हायरिंग सेंटरर्स चांगल्या कृषी पध्दती संदर्भात शेतकर्‍यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाईल. शेतकर्‍यांना संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. अशा वैशिष्ट्यपूर्ण केंद्रावरुन लहान शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चित्रफित दाखवली जाईल

स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी पध्दती, प्रगतीशील शेतकर्‍यांच्या यशोगाथा, नवनवीन विकसित तंत्रज्ञान, उत्पादने आणि त्यांचे वैज्ञानिक उपयोग यावरील चित्रफित त्याठिकाणी दाखविण्यात येणार आहे.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….