ट्रॅव्हल्स पुलावरून थेट पैनगंगा नदीत कोसळली; खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसचा भीषण अपघात; वृद्ध महिला दगावली

बुलढाणा आणि वाशिममध्ये काल दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

ट्रॅव्हल्स पुलावरून थेट पैनगंगा नदीत कोसळली; खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसचा भीषण अपघात; वृद्ध महिला दगावली
travels accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 8:15 AM

बुलढाणा : बुलढाणा येथे काल रात्री भीषण अपघात झाला आहे. पेठजवळ एक खासगी लक्झरी बस आणि ट्रॅव्हल्स दरम्यान भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार असल्याने ट्रॅव्हल्स चालकाला काहीच कळले नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स थेट पुलावरून पैनगंगा नदीत जाऊन कोसळली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी आहे. या जखमींवर खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

शेगांववरून पुण्याकरता जाण्यासाठी निघालेल्या स्वरा ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसला चिखली रोडवरील पेठजवळ रात्री साधारण 11 वाजता अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही ट्रॅव्हल्स पेठ गावाजवळील असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास 15 ते 20 फूट खोल कोसळलेल्या या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून एका वृद्ध महिला प्रवशाचा मृत्यू झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून जवळपास 25 ते 30 प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील तीन प्रवासी गंभीर असून इतरांना मुका मार लागला आहे.

हे सुद्धा वाचा

आक्रोश आणि टाहो

घटनेची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्यास सुरुवात केली. जखमी प्रवाशाना तातडीने बाहेर काढून चिखली येथील ग्रामीण रुग्णाल्यात तसेच खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. घटना झाल्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात अत्यंत भीषण होता, नदीत पडलेली ट्रॅव्हल्स पूर्णपणे उलटली होती. अपघातात जखमी झालेले प्रवासी प्रचंड किंचाळत होते. मदतीसाठी टाहो फोडत होतो. हा आक्रोश ऐकूनच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास अडथळे येत होते.

दोन कारला धडक

दरन्यान बुलढाण्यात काल आणखी एक भीषण अपघात झाला. बुलढाणा अजिंठा राज्य महामार्गावरील बुलढाण्यातील धाड नाका परिसरात साडे अकरा वाजता सुमारास एक विचित्र अपघात झाला. औरंगाबादला कुटुंबासह जाणाऱ्या डस्टर कारला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 गाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे डस्टर कारने समोरच्या एका गाडीला धडक दिल्याने विचित्र अपघात झाला. यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून डस्टर कारमधील काही जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

ट्रक उलटून अपघात

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाळापुर या राज्य महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका ट्रकचे टायर फुटल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातामुळे असंतुलित झालेला ट्रक समोर चालणाऱ्या एका प्रवासी मॅक्झिमो वाहनावर जाऊन उलटला. काल सायंकाळी घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मॅक्झिमो वाहनातील प्रवाशांना किरकोळ मार लागलेल्या प्रवाशांना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चौघांचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील नागपूर-संभाजी नगर महामार्गावर वडप नजीक उभ्या ट्रकला भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार तर 10 ते 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगेश शेषराव वाघ, अजय भारत शेलकर, दीपक सुरेश शेवाळे आणि अक्षय प्रभू चव्हाण अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. चौघांनाही वाशिमच्या जिल्हा सामान्य शव विच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.