AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरडीतून बाळाला वाचवताना भिंत कोसळली, 14 वर्षांच्या धावपटूचा पाय कापण्याची वेळ, आर्थिक मदतीचं आवाहन

'केईएम' रुग्णालयामध्ये साक्षी दाभेकरॉच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्यावर सावट आलं.

दरडीतून बाळाला वाचवताना भिंत कोसळली, 14 वर्षांच्या धावपटूचा पाय कापण्याची वेळ, आर्थिक मदतीचं आवाहन
धावपटू साक्षी दाभेकर
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 3:29 PM
Share

मुंबई : दरड कोसळताना दोन महिन्यांच्या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात अंगावर भिंत कोसळल्याने चिमुरडी धावपटू गंभीर जखमी झाली. या दुखापतग्रस्त विद्यार्थिनीवर शस्त्रक्रियेनंतर गुडघ्यापासून खाली पाय कापण्याची वेळ आली. त्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी आणि कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या. यावेळी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात 14 वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धिटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे साक्षी जबर जखमी झाली.

पाय गुडघ्यापासून खाली कापला

साक्षीला तातडीने रायगडहून मुंबईत हलवण्यात आले. ‘केईएम’ रुग्णालयामध्ये तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दुर्दैवाने तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्यावर सावट आलं.

उपचारासाठी मदतीची कुटुंबियांची मागणी

या मुलीची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी लाखो रुपयांच्या खर्चाचं आव्हान कुटुंबीयांसमोर उभं राहिलं आहे. सरकारने तिच्या या शौर्याची दखल घ्यावी आणि तिला पुढील उपचारासाठी मदत करावी अशी कुटुंबियांची मागणी आहे.

कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदत करा

14 वर्षांची साक्षी दाभेकर धावपटू आहे. कबड्डी आणि खो खो हे क्रीडा प्रकार ती तालुका स्तरावर खेळते. पण आता तिला पाय गमवावा लागला. लेकीची परिस्थिती बघून त्यांना अश्रू अनावर होतात. त्यामुळे साक्षीला कृत्रिम पाय बसवण्यासाठी दाभेकर कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं आवाहन दानशूरांना केलं जात आहे.

साक्षी दाभेकरला मदत करण्यासाठी बँक तपशील :

नाव – Pratiksha Narayan Dabhekar

Bank of India, Poladpur branch

A/c – 120310510002839

IFSC code – BKID 0001203

MICR – 402013520

संबंधित बातम्या :

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी

(Raigad Landslide Poladpur 14 years old runner Sakshi Dabhekar Leg cut after operation family appeals financial help)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.