Rajan Salvi : व्यावसायिक भागिदारच ACB कार्यालयात, दस्ताऐवज सोबत, ठाकरेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढणार?

Rajan Salvi ACB Ratnagiri : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचा मुलगा शुभम साळवी याचे बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत ACB कार्यालयात हजर झाले आहेत.

Rajan Salvi : व्यावसायिक भागिदारच ACB कार्यालयात, दस्ताऐवज सोबत, ठाकरेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढणार?
राजन साळवी, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 11:58 AM

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या बांधकाम व्यावसायातील भागीदार दिनकर सावंत एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. दिनकर सावंत भागीदार असलेल्या सर्व निविदांची कागदपत्रे घेऊन एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात दिनकर सावंत पार्टनर आहेत. त्यांना काही दिवसापूर्वी एसीबीने नोटीस बजावली होती. त्यानंतर ते थोड्यावेळापूर्वी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात हजर झाले. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दिनकर सावंत यांची चौकशी

राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची आज चौकशी करण्यात येत आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर मात्र, साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत आला नाही. राजन साळवी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात दिनकर सावंत यांची चौकशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

बांधकाम साईटची करणार चौकशी

रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर एक बांधकाम साईट आहे. एसीबीने पाठवलेल्या नोटीसमध्ये या साईटचा उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याचा एसीबीने जबाब नोंदवला होता. आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांना आज, 22 जानेवारी रोजी एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सावंत आज एसीबी कार्यालयात हजर झाले.

घनकचरा प्रकल्पाचे काम रडारवर

काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना एसीबीची नोटीस देण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे कम सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र केले होते. मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची आज चौकशी होत आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.