AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र-राज्य एकत्र, भाषण करण्याऐवजी मदत करा, राजू शेट्टींचा घणाघात

तिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र-राज्य एकत्र, भाषण करण्याऐवजी मदत करा, राजू शेट्टींचा घणाघात
RAJU SHETTY
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 7:11 PM
Share

बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेतकरी परिषदेमध्ये बोलत होते.

फक्त भाषणाने पोट भरत नाही

“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे शेट्टी म्हणाले. तसेच लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट

बीडचा दौरा पूर्ण केल्यानंतर राजू शेट्टी जालना जिल्ह्यात गेले होते. यावेळीदेखील त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात,” असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.

पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम

तसेच “पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करताना गांभीर्य दाखवले नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे खोटे रेकॉर्ड करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करताना पैशाची मागणी करतात. पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम होत आहे. मग या दरोड्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा आहे का ?” असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

गप्प बसणार नाही, लढाई छेडणार

दरम्यान, पुढे बोलताना शेतकऱ्यांवर दरोडे टाकत असाल तर आपण गप्प बसणार नाही. मोठी लढाई छेडणार, असा इशारादेखील राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सराकरला दिला.

इतर बातम्या :

महाराष्ट्र बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा; भाजप, मनसे संजय राऊतांच्या निशाण्यावर

ऊसाची FRP एकरकमी देणार, राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याची मोठी घोषणा

Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस

(raju shetty criticizes maha vikas aghadi and central government on farmer help and frp law while talking in jalna and beed)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.