भंडाऱ्यात निकृष्ट दर्जाचा ग्रीन जिम साहित्य पुरवठा, भ्रष्टाचार झाल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आरोप

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 26, 2021 | 3:42 PM

राज्य क्रीडा विभागाअंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर ग्रीन जिम संकल्पना राबवत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जिम बसविण्यात येत आहे, त्यासाठी 2019-20 मध्ये निविदा काढण्यात आली होती.

भंडाऱ्यात निकृष्ट दर्जाचा ग्रीन जिम साहित्य पुरवठा, भ्रष्टाचार झाल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आरोप
क्रीडा अधिकारी कार्यालय
Follow us

भंडारा: जिल्ह्यात क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांमध्ये ग्रीन जिम लावण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवठा करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते व जिल्हा हाकी अससोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी केला आहे. राज्य क्रीडा विभागाअंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर ग्रीन जिम संकल्पना राबवत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जिम बसविण्यात येत आहे, त्यासाठी 2019-20 मध्ये निविदा काढण्यात आली होती.

तीन कंपन्यांकडे पुरवठ्याची जबाबदारी

भंडारा जिल्ह्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, त्यात वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. भंडारा जिल्ह्यासाठी 1) जी.एस. ट्रेडिंग कंपनी चंद्रपूर,2) सुमित स्पोर्ट पुणे, 3) झेनीथ स्पोर्ट वाई, सातारा या कंपन्यांना टेंडर देण्यात आले होते. त्याआधी या कंपन्यांकडून ट्रायल करीत साहित्य मागविण्यात आले होते, ते साहित्य चांगल्य्या दर्जाचे असल्याने या कंपन्यांना भंडारा जिल्ह्यात 100 शाळा ग्रीन जिम बसविण्यासाठी पात्र असल्याने टेंडर देण्यात आले. मात्र, आता प्रत्यक्षात या कंपन्या निकृष्ट दर्जाचा साहित्य पुरवठा करत असल्याचे दिसून येत आहे, याची माहिती आरटीआय कार्यकतें सूर्यकांत इलमे यांनी दिली आहे.

बाजारभावापेक्षा अधिक किंमत आकारल्याचा दावा

शासनाच्या निविदेनुसार ट्रायल साहित्य प्रमाणेच गुणवत्ता पूर्ण साहित्य पुरवठा करावा लागेल असे नमूद आहे. मात्र,आता जे साहित्य लावण्यात येत आहे त्याची गुणवत्ता खूपच निकृष्ट आहे. उलट बाजार भावानुसार या साहित्यांची किंमत 50 हजाराच्या आसपास असताना या कंपन्यांनी 80 हजारच्या जवळ यांची किंमत आकारली आहे, याची गुणवत्ता तपासली जात नसल्याने अधिकारी व कंपन्यांमध्ये साटेलोटे असावा, असा संशय निर्माण झाला आहे. हा प्रकार फक्त भंडारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र याच कंपन्या साहित्य पुरवठा करत असल्याचा दावा केला जात आहे. तर या विषयी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी दोनदा संपर्क केला असताना त्यांच्याकडे नागपूर,गडचिरोली, आणि भंडारा जिल्ह्याचा पदभार असल्याने ते नागपूरलाच असल्याचे त्यांनीं सांगितले आहे. मात्र, या संदर्भात त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली तर भंडारा जिल्ह्यातच नाही इतर जिल्ह्यातील साहित्याचा दर्जा कसा आहे, हे समोर येईल.

इतर बातम्या:

अहमदनगर येथील सैन्यभरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; सप्टेंबरमधील भरती लांबणीवर, नेमकं कारण काय?

फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा

RTI activist Suryakant Ilame claimed Gym equipment supplied by sports department is low quality in Bhandara

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI