Karnataka Omicron | ओमिक्रॉन रुग्ण सापडलेल्या कर्नाटकात प्रवेशासाठी तपासणी, महाराष्ट्रात येणाऱ्यांचं काय?

सध्या देशासह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) दहशत पसरत आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta Variant) अधिक घातक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. या व्हेरिएंटचे दोन रुग्ण बाजुच्या कर्नाटक (Karnataka) राज्यात आढळून आल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. पण, कर्नाटक सरकारने मात्र याबाबतच्या खबरदारी घेण्यास आधीच सुरुवात केलीये.

Karnataka Omicron | ओमिक्रॉन रुग्ण सापडलेल्या कर्नाटकात प्रवेशासाठी तपासणी, महाराष्ट्रात येणाऱ्यांचं काय?

इचलकरंजी : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) दहशत पसरत आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta Variant) अधिक घातक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. या व्हेरिएंटचे दोन रुग्ण बाजुच्या कर्नाटक (Karnataka) राज्यात आढळून आल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. पण, कर्नाटक सरकारने मात्र याबाबतच्या खबरदारी घेण्यास आधीच सुरुवात केलीये.

कर्नाटक सरकारकडून आठ दिवसांपासून नाका-बंदी सुरु

कर्नाटक सरकारने आपल्याआधी सीमेवर नाकाबंदी आणि चेकपोस्ट लावले आहेत. कोगनोळी टोल नाक्यावर गेल्या आठ दिवसांपासून नाका-बंदी सुरु आहे. यामध्ये दोन लस घेतलेल्या वाहनधारकांनाच फक्त कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच, प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय कोणालाही कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. त्यामुळे वाहनधारक आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही होऊ लागले.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांची तपासणी, कर्नाटकातून राज्यात येणाऱ्यांचं काय?

सध्या इचलकरंजी लगत असणाऱ्या बोरगाव मार्गी मोठ्या प्रमाणात लोक कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येजा करत आहेत. कर्नाटक सरकारने या ठिकाणी नाकाबंदी केली असून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. आयको स्पिनिंग मिल जवळ कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषा आहे. महाराष्ट्र बोर्डजवळ महाराष्ट्र पोलीस आणि आरोग्य तपासणी नसल्यामुळे कर्नाटकातून राजरोसपणे लोक महाराष्ट्रात येत आहेत. पण, महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्यांची कर्नाटकातील चेकपोस्टकडून तपासणी होत आहे.

महाराष्ट्र आरोग्य तपासणी यंत्रणेकडून, पोलिसांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाहीये. फक्त नॅशनल हायवेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. चोर वाटेमुळे हजारो नागरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातून ये-जा करत आहेत. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस कधी जागे होणार असा सवाल निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

बोगसगिरी ! ओमिक्रॉनचा पहिला पेशंट सापडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला पळालाही, नेमका कसा?

Omicron Alert| 28 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीत; संशोधन झाल्याशिवाय ठोस सांगता येणार नाही – डॉ. प्रदीप आवटे

Published On - 12:56 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI