AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोगसगिरी ! ओमिक्रॉनचा पहिला पेशंट सापडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला पळालाही, नेमका कसा?

कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं खरं मानायचं झालं तर मग त्या संबंधीत रुग्णाची ओमिक्रॉनची टेस्टही कशी काय पॉझिटिव्ह आली? त्यावरही सवाल निर्माण होतो. म्हणजेच एअरपोर्टवर केलेली कोरोना चाचणी, आणि ओमिक्रॉन टेस्ट अशा दोन्हीवर आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यानं प्रश्न निर्माण होतात.

बोगसगिरी ! ओमिक्रॉनचा पहिला पेशंट सापडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला पळालाही, नेमका कसा?
कर्नाटकमधून ओमिक्रॉनचा पहिला पेशंट पळाल्याची माहिती, प्रशासनाचा दुजोरा
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 10:13 AM
Share

कोरोनाच्या काळात बोगसगिरी केल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिलीत, वाचलित पण आता ओमिक्रॉननं भीती निर्माण केलेली असतानाही ही बोगसगिरी थांबलेली दिसत नाही. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचा जो पहिला पेशंट सापडला त्यानं देशातून पळ काढल्याचं उघड झालंय. कर्नाटकच्या (Karnataka Omicron Cases) प्रशासनानं त्याला दुजोरी दिलाय. विशेष म्हणजे ओमिक्रॉनच्या ह्या पेशंटनं कोरोनाचा नेगेटीव्ह रिपोर्ट दाखवून पळ काढल्याचं स्पष्ट झालंय. पण त्याची कुठलीही टेस्ट झालेली नसताना सुद्धा त्याला कुठून कोरोनाचा रिपोर्ट (Omicron Report) मिळाला याचा आता शोध घेतला जातोय. पण पहिला पेशंट सापडला आणि तो पळूनही गेल्याची नोंद आता झालीय. पण ह्या एका घटनेनं अनेक प्रश्नांनाही जन्म दिलाय.

नेमकं काय घडलंय? कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये ओमिक्रॉनचे दोन पेशंट सापडलेत. त्यातला पहिला पेशंट हा दक्षिण आफ्रिकेतून (South Africa Omicron Patient in India) बंगळुरुत आलेला होता. तोही दुबई मार्गे. तो आला त्याचवेळेस त्याची एअरपोर्टवर कोरोना चाचणी केली गेली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन (Omicron Patient Guideline) करण्यात आलं. त्यावेळेस ओमिक्रॉनची आता जेवढी चर्चा आहे तेवढी नव्हती. प्राथमिक चर्चा सुरु होती. तरीही त्याची ओमिक्रॉनची टेस्ट केली गेली. त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा होती. 21 नोव्हेंबरला आफ्रिकन रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आणि 27 नोव्हेंबरला तो देश सोडून आफ्रिकेला पळालाही. दरम्यान त्यानं एका प्रायव्हेट लॅबचा नेगेटीव्ह रिपोर्ट मिळवला. तो कसा मिळवला त्याची माहिती अजून उघड होणं बाकी आहे. पण ओमिक्रॉनचा रिपोर्ट आल्यानंतर पालिकेचे अधिकारी त्याचा शोध घेत हॉटेलवर पोहोचले त्यावेळेस त्यानं कधीचच हॉटेल सोडल्याचं त्यांना कळवण्यात आलं. त्यानंतर तो पळून गेल्याचं स्पष्ट झालं.

कोण आहे तो पेशंट? दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरुत आलेला हा पेशंट एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी होता. त्याचं वय 66 वर्षे आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं गेलं. जिनोम सिक्वेन्सिंगही केली गेली. पण ओमिक्रॉनचा टेस्ट रिपोर्टआधीच त्यानं पळ काढला. त्याच्या संपर्कात आलेले 24 जण आणि त्यांच्या संपर्कात आलेले 240 जणांची कोरोना टेस्ट केली गेलीय. सुदैवानं त्यांचा रिपोर्ट हा नेगेटीव्ह आलाय. त्यावर बोलताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री म्हणतात, आम्हाला वाटतं की तो नेगेटीव्ह असावा, त्यामुळेच त्याच्या संपर्कातले सर्व जणांचा रिपोर्टही नेगेटीव्ह आलेला आहे. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं खरं मानायचं झालं तर मग त्या संबंधीत रुग्णाची ओमिक्रॉनची टेस्टही कशी काय पॉझिटिव्ह आली? त्यावरही सवाल निर्माण होतो. म्हणजेच एअरपोर्टवर केलेली कोरोना चाचणी, आणि ओमिक्रॉन टेस्ट अशा दोन्हीवर आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यानं प्रश्न निर्माण होतात.

हे सुद्धा वाचा: WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन मेसेज, अल्पवयीन तरुणी भेटायला, गाडीत बलात्कार

Masala Oats : वजन कमी करायचे आहे? मग मसाला ओट्सचा आहारात समावेश करा, जाणून घ्या खास रेसिपी!

Pune Crime| पुण्यात नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या अंगठी चोर महिलेला अटक ; चोरीची पद्धत ऐकून पोलीसही हैराण

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.