कोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या : संभाजीराजे छत्रपती

कोपर्डी अत्याचार प्रकरणात सरकारने विशेष बेंच स्थापन करून खटला फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

कोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या : संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 4:27 AM

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. कोपर्डीत अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे शनिवारी (12 जून) कोपर्डीत आले होते. यावेळी संभाजीराजेंनी कोपर्डी पीडितेच्या स्मारकावर जाऊन तिला अभिवादन केले. तसेच पीडित कुटुंबाशी चर्चा केली. यावेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटूंबाने संभाजीराजे यांच्यासमोर मांडल्या (Sambhajiraje Chhatrapati demand justice for Kopardi rape victim within 6 months).

“सरकारने या प्रकरणी स्पेशल बेंच स्थापित करण्याची मागणी करावी”

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “स्थानिक कोर्टात आरोपींना फाशी झाली आहे, पण दोषींना उच्च न्यायालयात जाता येतं. त्यामुळे फाशीची शिक्षा झालेले ते दोषी 2 वर्षानंतर अपील करू शकतात. त्यांनी 2019 मध्ये त्यांच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हापासून आजपर्यंत हा विषय प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे माझी सरकारला विनंती राहील की त्यांनी उच्च न्यायालयाला अर्ज करुन या प्रकरणी एक स्पेशल बेंच स्थापित करण्याची विनंती करावी. तसेच पुढील 6 महिन्यात या प्रकरणाचा निकाल लावून दोषींना शिक्षा होवी.”

“स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात निकाल द्या”

“मी पीडितेच्या घरातील आई-वडिलांशी बोललो आहे. पीडित कुटूंबाला अजूनही न्याय मिळत नाही. मेरीटवर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये ताबोडतोब अर्ज करावा. अर्जात स्पेशल बेंचच्या माध्यमातून ताबडतोब 6 महिन्यांत त्याचा निकाल यावा, अशी सरकारला माझी विनंती आहे. हा विषय उच्च न्यायालयात आहे. मी त्यावर मार्ग सांगेल. त्यावर अंमलबजावणी झाली की नाही हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे. सरकारने त्यावर आत्मचिंतन करावं,” असंही मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

“मी शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा वंशज, लोकांना वेठीस धरू शकत नाही”

“मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांच्या वंशज आहे. मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. मी 2007 पासून मराठा समाजाचा लढा देत आहे. हे केव्हा आले हेच मला माहित नाही. हे त्यांनाच विचारा. मला कोणी कोणी शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतील तर मी बोलेल. सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसायला लागले ही चांगली गोष्ट आहे.”

“मला माहित आहे देवाचे मंत्र सकाळीच बोलतात, मात्र आता संभाजीराजांचा मंत्र डोक्यात यायला लागलाय. याची कारणे त्यांच्या हृदयात आहे. हे त्यांनाच विचारा मी काय ज्योतिषी नाही. शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी ज्योतिषाला मानलाच नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे,” असा टोलाही त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लावलाय.

हेही वाचा :

कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला अखेर सरकारी नोकरीत नियुक्ती

Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती कोपर्डीत पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना

व्हिडीओ पाहा :

Sambhajiraje Chhatrapati demand justice for Kopardi rape victim within 6 months

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.