भाजपच्या खासदारकीवर लाथ मारा, त्यापेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ; हर्षवर्धन जाधवांचे संभाजीराजेंना आवाहन

भाजपच्या खासदारकीवर लाथ मारा, त्यापेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ; हर्षवर्धन जाधवांचे संभाजीराजेंना आवाहन
हर्षवर्धन जाधव आणि संभाजीराजे छत्रपती

Harshvardhan Jadhav | संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी. खासदार-आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ आहे. भाजपची खासदारकी ठेवून आंदोलन करण्याची दुटप्पी भूमिका योग्य नाही.

संतोष जाधव

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 12, 2021 | 3:20 PM

उस्मानाबाद: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपमध्ये राहून दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीवर लाथ मारावी, असे आवाहन माजी खासदार यांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. ते सोमवारी उस्मानाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी दिल्लीत धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणाही केली. संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी. खासदार-आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ आहे. भाजपची खासदारकी ठेवून आंदोलन करण्याची दुटप्पी भूमिका योग्य नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही तुमच्यासोबत येऊ. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी क्रांती दिनी दिल्ली होणाऱ्या धरणे आंदोलनातही सहभागी व्हावे, असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले. त्यामुळे आता यावर संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच केले होते. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.

संबंधित बातम्या:

‘पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’

खासदार उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार- हर्षवर्धन पाटील

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें