VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

Sambhaji Raje Chhatrapati | त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा.

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती
महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: अक्षय चोरगे

Jul 02, 2021 | 11:08 PM

बीड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. (Verbal scuffle between Sambhaji Raje Chhatrapati and Sambhaji brigade in beed)

त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आता या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक; सर्व स्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील: धनंजय मुंडे

महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या कायम बाजूने व सकारात्मक असुन, समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी खा. छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे.

खा. छत्रपती संभाजीराजे छत्रपती भोसले हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बीडचे आ. संदीप भैय्या क्षीरसागर, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे मा.आ.सय्यद सलीम, मा.आ.प्रा. सुनील धांडे, जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव यांसह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गंगाधर काळकुटे, अशोक हिंगे, शंकर कापसे यांसह आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या चळवळीतील मी अत्यंत सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता असून, सदैव आंदोलन व मोर्चात सक्रिय सहभाग घेतलेला आहे, असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. तर मुंडेंच्या या भूमिकेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी स्वागत केले.

(Verbal scuffle between Sambhaji Raje Chhatrapati and Sambhaji brigade in beed)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें