कृष्णाच्या निवडणुकीचा वाळव्यातील प्रचार, नागरिकांची बेपर्वाई, सांगली पुन्हा चौथ्या स्तरात

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने वाळवा तालुक्यात पार पडलेल्या तुफान प्रचार सभा आणि सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा बेजबाबदारपणा हे कोरोना रुग्णवाढीचं मुख्य कारण आहे.

कृष्णाच्या निवडणुकीचा वाळव्यातील प्रचार, नागरिकांची बेपर्वाई, सांगली पुन्हा चौथ्या स्तरात
corona virus

सांगली: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड मधल्या कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने वाळवा तालुक्यात पार पडलेल्या तुफान प्रचार सभा आणि सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा बेजबाबदारपणा हे कोरोना रुग्णवाढीचं मुख्य कारण आहे. त्यामुळेच सांगली जिल्हा राज्यातल्या कोरोनाच्या हॉस्पॉट पैकी एक जिल्हा बनला आहे. (Sangli Corona Update Krishna Sugar Mill and Peoples carelessness caused to increase corona cases and positivity rate in Sangli)

सांगलीत कोरोना रुग्ण का वाढले?

सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्ण संख्या गेल्या महिन्यात आटोक्यात आली होती,त्यामुळे जिल्ह्याच्या चौथ्या स्तरात असणारा समावेश तिसऱ्या स्तरात झाला होता.मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोणाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आणि परिणामी सांगली जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात गेला. जिल्ह्यातील कोरोनाची हॉटस्पॉट जे वाळवा तालुका आणि सांगली महापालिका क्षेत्र ठरले आहेत.याचे प्रमुख कारण म्हणजे वाळवा तालुक्या शेजारी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या कराड येथील कृष्णा कारखान्याची पार पडलेली निवडणूक होय.

कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाळवा तालुक्यात आहे. आणि या निवडणुका निमित्ताने वाळवा- इस्लामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रचार सभा,रॅली पार पडल्या,याला मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी ही तालुक्यातील कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरली. त्यामुळेच जिल्ह्यात आज गेल्या दहा दिवसांपासून वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंद होत आहे.

नागरिकांची बेपर्वाई

दुसऱ्या बाजूला सांगली महापालिका क्षेत्रात ही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्ण संख्या अधिकच आहे,आणि याला मुख्य कारण म्हणजे बाजारपेठ जरी बंद असले तरी इतर कारणांनी शहरात होणारी रोजची अनावश्यक गर्दी होय. वाळवा तालुका आणि महापालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्येचा परिणाम जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट वाढलेला पाहायला मिळत आहे ,आणि परिणामी राज्यात सांगली जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

इतर बातम्या:

पारनेरच्या 11 गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण, प्रशासनाकडून लॉकडाऊन, ‘कोरोनामुक्त पारनेर’ निलेश लंकेंच नवं मिशन

आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावर?; वाचा बाळसाहेब थोरात काय म्हणाले?

(Sangli Corona Update Krishna Sugar Mill and Peoples carelessness caused to increase corona cases and positivity rate in Sangli)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI