सांगली पूर : बचावकार्यावेळी महापालिकेची बोट अडकली, नगरसेवकासह सहा जण पाण्यात पडले

सांगलीतील पुराच्या पाण्यात बचाव कार्य करत असताना महापालिकेच्या बोटीला लाकडी ओंडक्यामुळे धक्का लागून बोटीचं पातं तुटलं आणि बोट पाण्यातच अडकली.

सांगली पूर : बचावकार्यावेळी महापालिकेची बोट अडकली, नगरसेवकासह सहा जण पाण्यात पडले
सांगलीत बोट अडकून सहा जण पाण्यात पडले
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:13 AM

सांगली : सांगलीतील पुराच्या पाण्यात बचावकार्य करताना महापालिकेची बोट अडकून सहा जण पाण्यात पडले. नगरसेवक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह सहा जण पुराच्या पाण्यात पडले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नेमकं काय घडलं?

सांगलीतील पुराच्या पाण्यात बचाव कार्य करत असताना महापालिकेच्या बोटीला लाकडी ओंडक्यामुळे धक्का लागून बोटीचं पातं तुटलं आणि बोट पाण्यातच अडकली. यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, दोन महापालिकेचे कर्मचारी, एक महिला आणि एक पुरुष असे सहा जण पुराच्या पाण्यात पडले.

सांगली कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदय शेजारी ही घटना घडली. खांबाला बोट बांधून ठेवली असून सगळे जण बोटीतच अडकून पडले आहेत. दुर्दैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जयंत पाटलांचा सांगली दौरा

दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहेत. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिला.

जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास 15 पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत नुकसानाची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून योग्य त्या सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित बातम्या :

अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी

सरणार कधी रण? मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

(Sangli Flood Municipal Corporation Boat stuck near poll six falls in water)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.