AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तबब्ल आठ गोळ्या झाडल्या, सांगली शहर हादरलं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सांगली शहरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा कार्यकर्ता आपल्या घराच्या दारावर बसला होता. यावेळी त्याच्यासोबत अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तबब्ल आठ गोळ्या झाडल्या, सांगली शहर हादरलं
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 10:14 PM
Share

सांगली : सांगली शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली. मुल्ला यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी योग्य संधी साधत मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या आहेत.

राहत्या घराच्या दारात बसलेले असताना हल्ला

सांगलीत काही दिवसांपूर्वीच भरदिवसा दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे आपल्या राहत्या घराच्या दारात बसले होते. यावेळी काही हल्लेखोर आले. त्यांनी नालसाब यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते तिथून पसार झाले.

हल्लेमागील नेमकं कारण काय?

नालसाब मुल्ला यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विश्रामबाग पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव आणि इतर पोलीस अधिकार घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय. अज्ञात आरोपी हे गजबजलेल्या परिसरात आले. त्यांनी गोळीबार केला. नंतर ते तिथून लगेच पळूनही गेले. पोलीस आता आरोपी नेमके कोणत्या दिशेला पळून गेले, हल्ल्याचं नेमकं कारण काय, नेमकं काय घडलंय, याची सविस्तर माहिती घेत आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....