भर पावसात रंगला कुस्तीचा थरार, सिकंदर शेख आणि इराणच्या मल्लात कुस्ती, हा ठरला विजेता

या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे महिलांच्या कुस्त्या आकर्षणाचा केंद्र होत्या.

भर पावसात रंगला कुस्तीचा थरार, सिकंदर शेख आणि इराणच्या मल्लात कुस्ती, हा ठरला विजेता
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 8:53 AM

सांगली : सांगलीच्या (Sangli) कुरळप या गावात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पैलवान अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरळप ग्रामस्थांच्या वतीने हनुमान यात्रेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कुस्ती (Kusti) स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं. यामध्ये सुमारे 100 हून अधिक छोट्या-मोठ्या कुस्त्या पार पडल्या. तसेच महिलांच्याही यानिमित्ताने विशेष कुस्त्या झाल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे महिलांच्या कुस्त्या आकर्षणाचा केंद्र होत्या.

चार लाख रोख आणि बुलेट गाडी

भर पावसात रंगलेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेखने इराणच्या अली मेहरी याला चितपट केले आहे. विजेत्या सिकंदर शेखला यावेळी चार लाखांचं रोख बक्षीस, बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पावसाने लावली हजेरी

चार लाख रुपये आणि बुलेट गाडीसाठी महान भारत केसरी पैलवान सिंकदर शेख आणि इराणच्या आंतरराष्ट्रीय विजेता अली मेहरी यांच्यात प्रमुख लढत पार पडली. कुस्त्यांचे मैदान सुरू असताना पाऊसाने हजेरी लावली. पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान अली मेहेरी यांच्यामध्ये देखील भर पावसात लढत झाली.

तीन मिनिटे चालला थरार

विजांच्या कडकडाटासह भर पावसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख याने दुहेरी पट काढला. एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला आहे.

भर पावसात रंगलेल्या या कुस्ती स्पर्धा पाहून कुस्ती शौकनांचे डोळ्याचे पारणे फिटले. भर पावसात पार पडलेल्या या कुस्ती मैदानात जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी देखील हजेरी लावत कुस्त्यांचा थरार अनुभवला.

सामन्यावेळी पावसाची हजेरी

गेल्या दोन दिवसापासून सांगली आणि परिसरामध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा होता. त्याचप्रमाणे वातावरण सुद्धा ढगाळ बनले होते. काल सायंकाळी अचानकपणे पावसानं हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवले. त्यामुळे उष्म्यापासून हैरण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.