लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, संजय काका पाटलांचे सरकारला दोन दिवसांचे अल्टिमेटम

जिल्ह्यामधील लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, असा इशारा भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला.

लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, संजय काका पाटलांचे सरकारला दोन दिवसांचे अल्टिमेटम
CORONA

सांगली : जिल्ह्यामधील लॉकडाऊन उठवा अन्यथा रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, असा इशारा भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला. येत्या दोन दिवसात निर्णय झाला नाही तर भाजपचे आमदार, खासदार मार्केटमध्ये जाऊन दुकान उघडी करतील असंही त्यांनी म्हटलंय. (Sanjay Kaka Patil demands to lift Corona rule and allow to open shops in Sangli district)

भाजपचे आमदार आणि खासदार स्वत:हून दुकाने उघडी करतील

राज्यातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हा वगळता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी पाश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. याच कारणामुळे सांगली जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांना आता विरोध होत असून दुकाने सुरु करु द्यावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत दुकाने उघडी करण्यास परवानगी दिली नाही तर भाजपचे आमदार आणि खासदार स्वत:हून दुकाने उघडी करतील, असा इशारा त्यांनी दिला.

वाळवा, कडेगाव, पलूस या तालुक्याची शिक्षा इतरांना का ? 

तसेच लोकांची सहनशीलता संपली आहे. किती दिवस सहन करायचे. सर्वच ठप्प आहे. व्यापार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. एकीकडे कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक झाल्याने कोरोना रुग्ण वाढले. वाळवा, कडेगाव, पलूस या तालुक्याची शिक्षा इतर तालुक्यांनी का घ्यावी असा सवालही त्यांनी केला. पुढे बोलताना ज्या तालुक्यात रुग्ण संख्या कमी आहे; त्या तालुक्यातील दुकानं उघडी करु द्यावीत अशी संजय काका पाटील यांनी मागणी केली.

चौथ्या स्तराचे निर्बंध

दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्याच्या पुढे आणि वीस टक्क्यांच्या आत असल्याने सांगली जिल्ह्याचा 19 जुलैपर्यंत चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला होता.

इतर बातम्या :

खावटी अनुदान हे गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं सकारात्मक पाऊल- एकनाथ शिंदे

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशकात आज 80 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 4 मृत्यू

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरुवारी निकाल, CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

(Sanjay Kaka Patil demands to lift Corona rule and allow to open shops in Sangli district)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI