खावटी अनुदान हे गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं सकारात्मक पाऊल- एकनाथ शिंदे

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेचं ऑनलाइन उद्घाटन आज करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.

खावटी अनुदान हे गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं सकारात्मक पाऊल- एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 10:57 PM

मुंबई : आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देऊ केलेलं खावटी अनुदान हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेनं टाकलेलं एक सकारात्मक पाऊल आहे. असे गौरवोद्गार नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेचं ऑनलाइन उद्घाटन आज करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. (Online inauguration of Khawati scheme under Integrated Tribal Development Project in Gadchiroli district)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात सगळ्यांनाच लॉकडाऊन पाळावा लागला. याचा फटका इतर सर्व घटकाप्रमाणेच हातावर पोट घेऊन जगणाऱ्या आदिवासी समाजालाही बसला. या अवघड काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी 2013 साली बंद करण्यात आलेली खावटी कर्ज योजना अनुदान स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा आणि मुलचेरा या तीन तालुक्यातील लाभार्थ्यांना आज अनुदान वाटप करण्यात आलं.

30 जुलै पर्यंत उर्वरीत लाभार्थ्यांपर्यंत हे किट्स पोहचवण्याचा मानस

या अनुदानाचे स्वरूप 2 हजार रुपये प्रत्यक्ष खात्यात तर 2 हजार रुपयांचे अन्नधान्याचे किट असं 4 हजार रुपये असे आहे. आज अहेरी तालुक्यातील 11 हजार 431 लाभार्थ्यांना 2 हजार रुपये रक्कम आणि 4 हजार 72 लाभार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आलं. तर भामरागड एटापल्ली तालुक्यातील 21 हजार 893 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये अनुदान तर 14 हजार 048 लाभार्थ्यांना अन्नधान्य किट्सचे वाटप करण्यात आले. येत्या 30 जुलै पर्यंत उर्वरीत सर्व लाभार्थ्यांपर्यंत हे किट्स पोहचवण्याचा आदिवासी विकास विभागाचा मानस आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना निश्चितच फायदा

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पुढाकाराने मिळालेल्या या अनुदानाचा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उत्तम रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, दळणवळण साधन आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्यास गडचिरोली जिल्ह्याचा नक्की कायापालट होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून हा जिल्ह्या इतर जिल्ह्याप्रमाणे मुख्य प्रवाहात आणल्यास तो नक्कीच नक्षलवादापासून मुक्त होऊ शकेल, असंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील धान पिकाचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी गोडाऊन उभी करणे, तसंच जिल्ह्यातील विजेच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुरेसा निधी दिल्यास या जिल्ह्याचे चित्र बदलण्याच्या दृष्टीने ते निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आदिवासी विकास विभागाचा पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याला या विभागाचे मंत्री के.सी.पाडवी, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार रामदास अंबटकर आणि इतर अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या :

Ashadhi Wari 2021 : आषाढी एकादशी निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी टाळ, मृदुंगाच्या तालात धरला ठेका

कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम 9 महिन्यांत पूर्ण करणार; एकनाथ शिंदेंनी केली पाहणी

Online inauguration of Khawati scheme under Integrated Tribal Development Project in Gadchiroli district

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.