AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर कुत्ते के दिन आते है… माकड येतात, तसे हत्तीही घुसतात, संजय राऊत आक्रमक; शिंदे गट, भाजपवर जोरदार हल्लाबोल

परिस्थिती जैसे थे ठेवून निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत नव्हती. कारण त्यांना विजयाची खात्री नव्हती. म्हणूनच तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून हा निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे.

हर कुत्ते के दिन आते है... माकड येतात, तसे हत्तीही घुसतात, संजय राऊत आक्रमक; शिंदे गट, भाजपवर जोरदार हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 18, 2023 | 11:36 AM
Share

कणकवली : निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तीन लोकांनी खुर्च्यांवर बसून हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा गळा दाबून निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे, असं सांगतानाच हर कुत्ते के दिन आहे है; असा घणाघाती हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

संजय राऊत हे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतानाच भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीतली महाशक्ती आहे, त्यांनी यांना वचन दिलं. चिन्ह आणि पक्षाचा सातबारा तुमच्या नावावर करून देऊ. हर कुत्ते के दिन आते है… ही म्हण आहे. कोकणात जशी माकडं येतात, तसे हत्तीही घुसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सूडभावनेतून केलेलं कृत्य

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. मी कणकवलीत आहे. त्यामुळे बैठकीला पोहोचू शकणार नाही. पण केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेचा प्रचंड धसका घेतला आहे. शिवसेनेला खतम करण्यासाठी त्यांचा डाव सुरू आहे.

या भीतीतून आणि सूडभावनेतून केलेलं हे कृत्य आहे. हे लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार आहे. जनता हे सहन करणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला.

निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती

परिस्थिती जैसे थे ठेवून निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत नव्हती. कारण त्यांना विजयाची खात्री नव्हती. म्हणूनच तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून हा निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे, असं सांगतानाच हिंमत असेल तर निवडणूका घ्या, शिवसेना कुणाची हा फैसला जनतेला करू द्या, असं आव्हानच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

टोळ्या येतात आणि जातात

काही आमदार आणि खासदार विकत घेतले म्हणून शिवसेना तुमची होत नाही. खरी शिवसेना ही जनतेच्या मनात आहे. बांगलादेशी देशात घुसले म्हणून देश त्यांचा होत नाही. टोळ्या येतात आणि जातात. त्यांची दखल घ्यायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला लागलेला शाप

काही लोकांच्या शेपट्या फुरफुरायला लागल्या आहेत. त्यांना शिवसैनिकांनी ठोकून बाहेर काढलंय. आपापसात संघर्ष व्हावा, डोकी फुटावी आणि भाजपने तमाशा पाहावा, असं सर्व चाललं आहे. ही यंत्रणा दिल्लीतून चालते. हे या लोकांना कळत नाही. महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे, दिल्ली मजा बघतेय, असा हल्ला त्यांनी चढवला.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.