अधिकाऱ्यांची मनमानी, सरपंचांची सटकली, जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या…

जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील सरपंचाने जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या. (Sarpanch balaji Pawde burns files in front of nanded ZP officer)

अधिकाऱ्यांची मनमानी, सरपंचांची सटकली, जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या...
सरपंच बालाजी पावडे यांनी नांदेड जि.प. अधिकाऱ्यांसमोर फाईल जाळल्या...

नांदेड : जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील सरपंचाने जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला जिल्ह्यातील सरपंच वैतागून गेलेय. किनवटच्या घोटीमधल्या सरपंचांना राग अनावर होऊन त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातच अधिकाऱ्यांसमोर फाईल जाळल्या. (Sarpanch balaji Pawde burns files in front of nanded ZP officer)

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाल सरपंच कंटाळले

नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला जिल्ह्यातील सरपंच वैतागून गेलेत. पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय. मात्र पाणीपुरवठा विभाग टंचाईच्या कामांना मंजुरी देत नसल्याने सरपंच वैतागून गेले आहेत.

सरपंचांना भयानक अनुभव, अधिकाऱ्यांसमोर फाईल जाळल्या

दुर्गम किनवट तालुक्यातील घोटी इथले सरपंच बालाजी पावडे यांना असाच अनुभव आला. त्यामुळे त्यांनी टंचाई आराखड्याच्या फाईलची जिल्हा परिषदेसमोर होळी करत आपला संताप व्यक्त केलाय. अधिकारी सामान्यजनतेकडे लक्ष देत नाहीत, तसंच कर्तव्यात कसूर करतात, अशा तक्रारींचा पाढा वाचत कामचुकार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच बालाजी पावडे यांनी केली.

पाणीपुरवठा विभागाच्या कामांना गती मिळत नाही, तक्रारी वाढल्या!

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या कामांना गती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी या सरपंचांनी फाईलची होळी करत आपला संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या सरपंचाने केलीय.

अधिकाऱ्यांना वठणीवर आणावं

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून सर्वसामान्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने सोडून घ्यायला हवेत, यावर कार्यवाही करणं आवश्यक आहे. सध्या गरिब शेतकरी, शेतमजूर पिचलेला आहे. असा काळात त्यांच्या न नाडता त्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न वेळ न दवडता हातावेगळे करण्याची गरज आहे, अशा भावना जिल्यातील अनेक सरपंच व्यक्त करत आहेत.

(Sarpanch balaji Pawde burns files in front of nanded ZP officer)

हे ही वाचा :

पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

पावसानं टेन्शन वाढवलं, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! 86 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI