धुळे : एकिकडे कोरोना विरोधात लढाईबाबत आरोग्य यंत्रणा तयार असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयांची स्थिती मात्र वेगळंच काही तरी सांगतेय. धुळे शहरालगत असणाऱ्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या वॉर्डातच चक्क घाणीचं साम्राज्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या विभागात घाणीचे साम्राज्य असेल तर रुग्णाचे आरोग्य सुधारणार तरी कसे? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहे.