सोलापूरमध्ये शाळांची घंटा वाजणार, 8 वी ते 12 वीपर्यंत वर्ग भरवण्याचा मार्ग मोकळा

पुढील आठवड्यापासून सोलापूर शहरातील शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाने मंगळवारी (10 ऑगस्ट) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश आहे.

सोलापूरमध्ये शाळांची घंटा वाजणार, 8 वी ते 12 वीपर्यंत वर्ग भरवण्याचा मार्ग मोकळा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 9:20 AM

सोलापूर : पुढील आठवड्यापासून सोलापूर शहरातील शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाने मंगळवारी (10 ऑगस्ट) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश आहे. आता शाळा सुरू करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार आता पुढील मंगळवारपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 565 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर ग्रामीण भागातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तर सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकाही कोरोना बाधित मृतांची नोंद नाही.

सोलापूरमधील म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर

सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर पोहचलीय, तर आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय.

बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण

सोलापूरमधील बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण आढळले. मागील पाच दिवसात 96 रुग्ण आढळून आल्यानंतर 24 तासात 62 नवे रुग्ण आढळले. यापैकी एक जणाचा कोरोनाने मृत्यू झालाय.

पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन

सोलापूर ग्रामीण भागात आठवडा बाजार भरू नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन करण्यात आलेय. मागील आठवड्यात वळसंग येथे आठवडा बाजार भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळेच आता प्रशासनाने हे आवाहन केलंय. टीव्ही 9 मराठीच्या बातम्यांची दखल घेत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतींनी आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन केलंय.

ग्रामपंचायतींकडून सायकलवर स्पीकर लावून बाजारात न येण्यासाठी आवाहन करण्यात येतंय. तसेच नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिलाय.

हेही वाचा :

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

जळगावात फी न भरल्याने शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं, जि.प. सभापतींकडून कारवाईचा इशारा

पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार : उदय सामंत

व्हिडीओ पाहा :

Standard 8th to 12th Schools will be open in Solapur from 17 August 2021

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.