AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत

ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दा नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत
गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 7:23 PM
Share

मुंबई : पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छिमार श्रीधर चामरेच्या कुटुंबाला राज्य सरकार 5 लाखाची मदत करणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी ही माहिती दिली. श्रीधरचा 6 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. यामुळे मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भारत-पाक हद्दीनजीक मासेमारी करताना घडली घटना

गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका ‘जलपरी’ मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दा नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला. गुजरातमधील वनगबरा येथील मालक नानजी राठोड यांच्या ‘जलपरी’ बोटीवर पालघर तालुक्यातील वडराई गावातील श्रीधर चामरे हा गेल्या तीन महिन्यांपासून खलाशी म्हणून काम करीत होता.

बोटीवरील कॅप्टन जखमी

पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी भारतीय मच्छीमारावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बोटीवरील कॅप्टन तांडेल यांना एक गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण घटनेचा मच्छीमार बांधवासहित कुटुंबीयांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला आहे.

मूळ गावी श्रीधरवर अंत्यसंस्कार

शवविच्छेदनानंतर श्रीधर चामरेचा मृतदेह आज पहाटे 5 वाजता त्याच्या मूळ गावी वडराई येथे आणण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण मच्छीमार समाजाकडून श्रीधरला अखेरचा निरोप देण्यात आला. (The state government will provide Rs 5 lakh to the family of a fisherman who died in the firing)

इतर बातम्या

बंगालमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळणे जीवावर बेतले, दोन तरुणांना लोकलने चिरडले, वाचा काय घडले?

एस.टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठींबा

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.