सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद, आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार

खानापूर तालुक्यातील करंजे खानापूर येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर 4 ऑगस्ट 2021 रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारूती विठोबा माने यांनी विटा पोलिसात दिली होती. खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी येडगे याला विटा येथे अटक केली.

सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद, आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार
सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद

सांगली : सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून दहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सिताराम लक्ष्मण येडगे जि. सोलापूर असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 10 लाख 12 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती विटा पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. (Thief arrested for stealing from Sangli police records)

खानापूर तालुक्यातील करंजे खानापूर येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर 4 ऑगस्ट 2021 रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारूती विठोबा माने यांनी विटा पोलिसात दिली होती. खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी येडगे याला विटा येथे अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता सांगली व सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.

आरोपीकडून लाखोंचा माल जप्त

आरोपीकडून विविध ठिकाणी चोऱ्या केलेला 3 लाख 34 हजाराचा एक ट्रॅक्टर, 4 लाख 58 हजार रूपयांचे सहा रोटर, 55 हजाराचे एक औषध फवारणी करण्याचे यंत्र, 99 हजाराचे स्टाईल फरशीचे 99 बॉक्स, 50 हजार रुपये किंमतीचे एक टन लोखंडी अॅंगल, 4 हजार 500 रुपयांची आठ सिमेंट पत्र्याची पाने व 12 हजाराचे आठ रंगाचे डबे असा 10 लाख 12 हजार 500 रूपयांचा असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर कवठे महांकाळ, आटपाडी, सांगोला, विटा पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा

शहरात अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी (illigal drugs and norcotics ) आणणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी (Aurangabad city chauk police) अटक केली आहे. त्याच्याकडून मानवी शरीरासाठी अपायकारक औषधी जप्त करण्यात आली आहेत. शहरातील लेबर कॉलनी परिसरातील विश्वास नगरात पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

डेटिंग अ‍ॅपवर हेरायचे सावज, भेटायला बोलावून तरुणांची लूट

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये रविवारी दुपारी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. कोतवाली सेक्टर 58 पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने ब्ल्यूड या डेटिंग अ‍ॅपद्वारे (Blued App) तरुणांशी मैत्री करुन त्यांना लुटल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींकडून नऊ मोबाईल फोन, दुचाकी, बंदुक आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिस आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. कोतवाली सेक्टर 58 पोलिसांना अशी माहिती मिळाली होती, की या परिसरात लूटमार आणि दरोडा घालण्यासाठी निष्णात गुन्हेगार येणार आहेत. पोलिसांना अशीही माहिती मिळाली होती की, ब्ल्यूड अॅपच्या माध्यमातून हे बदमाश तरुणांशी मैत्री करतात, त्यांना भेटायला बोलावून लुटतात, तसेच पादचाऱ्यांकडून मोबाईल फोन आणि सोनसाखळीही हिसकावतात.

इतर बातम्या

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI