धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

तीन दिवसांपूर्वी विनोद जंगलातून तीन भाऱ्या लाकूड घेऊन आला होता, त्यापैकी दोन भाऱ्या त्याचे वडील सुखराम यांनी बाजारात विकल्या. जेव्हा विनोदला हे कळले तेव्हा त्याने प्रथम आई आणि नंतर वडिलांना कुऱ्हाडीने ठार केले.

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
प्रातिनिधीक फोटो

गुमला : झारखंडच्या गुमला जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून मुलाने आपल्याच आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. प्रकरण गुमला जिल्ह्यातील बिशुनपूर पोलीस स्टेशन परिसरातील होलेंग गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा जंगलातून लाकडे घेऊन आला होता. ती लाकडं त्याच्या वडिलांनी विकून टाकली. यामुळे मुलगा इतका संतापला की त्याने जन्मदात्या आई-वडिलांचाच कुऱ्हाडीने काटा काढला. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (Son kills his mother and father in Jharkhand)

काय आहे प्रकरण?

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला अटक केली. यासह दोन्ही मृतदेह गुमला सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी विनोद जंगलातून तीन भाऱ्या लाकूड घेऊन आला होता, त्यापैकी दोन भाऱ्या त्याचे वडील सुखराम यांनी बाजारात विकल्या. जेव्हा विनोदला हे कळले तेव्हा त्याने प्रथम आई आणि नंतर वडिलांना कुऱ्हाडीने ठार केले. लोकांनी सांगितले की मुलगा कुऱ्हाड घेऊन फिरत होता म्हणून त्याची आई झुडपात लपली आणि वडिल बाजारातून परतताना खड्ड्यात लपले, तरीही मुलाने दोघांना ठार मारले.

याबाबत एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी सांगितले की, सनियारो देवी आणि सुखराम ब्रिजिया त्यांचा लहान मुलगा विनोद ब्रिजियासोबत एकत्र राहत होते. संपूर्ण कुटुंब जंगलातून लाकूड आणून विकत असत आणि बांबूचे सूप बनवून विकत असत. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कुऱ्हाड आणि विनोदकडून गांजा जप्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

जयपूरमध्ये सख्या वहिनीवर दिराकडून वारंवार बलात्कार

जयपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील बागरू पोलीस स्टेशन परिसरात नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. सख्या दिरानेत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत कुठेही वाच्छता केल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारेन अशी धमकी आरोपी पीडितेला देत होता. पीडिता भीतीपोटी सर्व काही सहन करीत होती. शेवटी सहन न झाल्याने तिचा संयम सुटला आणि तिने तिच्या नवऱ्याला याबाबत सांगितले. यानंतर पती-पत्नी दोघांनीही पोलिसांकडे धाव घेत घडल्या प्रकाराबाबत सांगितले. पीडितेच्या अहवालावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

चुरूमध्ये तरुणाने मित्रांसह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार

अलीकडेच चुरू जिल्ह्यात देखील नातेसंबंधाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तेथे एका तरुणाने एका विवाहित महिलेशी मैत्री करून तिला आपली बहिण बनवले. नंतर रक्षाबंधनाला तिच्याकडून राखीही बांधून घेतली. त्यानंतर एक दिवस आरोपी त्याच्या मित्रांसह महिलेच्या सासरी गेला आणि घरी जाण्याचा हट्ट करु लागला. पीडित त्याच्या बोलण्यात आली. तो तरुण आणि त्याच्या मित्रांनी पीडितेचे अपहरण करून तिला कळवड येथे नेले. येथे त्याने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी याचा व्हिडिओ बनवला आणि अश्लील फोटोही काढले. त्यानंतर व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

इतर बातम्या

जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा जीव घेतला, औरंगाबादेत कुख्यात गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI