AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेगावात छोट्या बालकाचा ‘अचाट प्रताप’, बॅटरीचा सेल गिळला, मुलाच्या वडिलांना डॉक्टरातील देवमाणसाचं दर्शन

लहान मुलं सर्रासपणे एखादी वस्तू उचलून तोंडात घालण्याच्या मागे असतात. त्यांना हातात मिळेल ती वस्तू तोंडात पहिल्यांदा खायची असते. मात्र यामुळे अनेकदा चिमुकल्यांच्या जीवाला धोका पोहोचतो.

शेगावात छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप', बॅटरीचा सेल गिळला, मुलाच्या वडिलांना डॉक्टरातील देवमाणसाचं दर्शन
शेगावात छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप', बॅटरीचा सेल गिळला
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 6:30 PM
Share

बुलडाणा : लहान मुलं सर्रासपणे एखादी वस्तू उचलून तोंडात घालण्याच्या मागे असतात. त्यांना हातात मिळेल ती वस्तू तोंडात पहिल्यांदा खायची असते. मात्र यामुळे अनेकदा चिमुकल्यांच्या जीवाला धोका पोहोचतो. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानग्यांना जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेणं गरजेचं असतं. बुलडाण्यात अशाच एका चिमुकल्यानं एक लहानशी वस्तू खाल्ली आणि त्याच्या जीवावर बेतलं.

नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथील एक साडेतीन वर्षाच्या मुलाने खेळताखेळता मोठ्या आकाराचा बटन बॅटरी सेल गिळला आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रास जाणवू लागला. तसेच मळमळ वाढल्याची तक्रार त्याने पालकांकडे केली. त्याच्या पालकांनी त्याला तातडीने शेगावच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. प्रकरण गंभीर असल्याने तेथून त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले. पण नातेवाईकांनी बाळाला अकोला न नेता प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल शेगांव येथे आणले.

डॉक्टरांचा दुसऱ्या दवाखानात दुर्बिणीद्वारे सेल काढण्याचा सल्ला

मुलाचा Xray केला असता तो सेल अन्ननलिकेत अडकून असल्याचे निदर्शनास आले. बटन बॅटरी सेलमध्ये अत्यंत घातक केमिकल असून अन्न नलिकेत गेल्याबरोबर सेलचे विघटन सुरू होते. सेल काढण्यास साधारणपणे 2 तासांपेक्षा विलंब झाल्यास अन्ननलिकेला छिद्र होऊन बाळाच्या जीवास धोका उद्भवू शकतो. तसेच बाळास आयुष्यभर अन्ननलिकेच्या व्याधी होऊ शकतात. त्यामुळे बाळाला लवकरात लवकर अकोला येथे हलवून दुर्बिणीद्वारे सेल काढण्याचा सल्ला देण्यात आला.

डॉक्टरांनी बाळाच्या अन्ननलिकेतून सेल कसा काढला?

मात्र बाळाचे वडील हे एका स्थानिक दुकानात मजुरी काम करत करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तसेच पुढील उपचारास विलंब झाल्यास बाळाच्या जीवितास धोका लक्षात घेता येथेच काहीतरी करण्याची विनंती नातेवाईकांनी केली. तेव्हा डॉ. सचिन सांगळे यांनी एक आगळीवेगळी शक्कल लढवून लघवीच्या जागी वापरण्यात येणाऱ्या Foley’s कॅथेटरचा बलून कॅथेटर सारखा वापर करून सेल काढण्याचा निर्णय घेतला.

तोंडावाटे कॅथेटर ढकलून सेल असलेल्या जागेच्या पुढे नेण्यात आले, आणि तेथे त्याच्या टोकाला असलेला बलून फुगवण्यात आला. तसेच कॅथेटर बाहेरच्या दिशेने ओढून काढण्यात आले. कॅथेटरसोबत बॅटरी सेलपण सहजपणे बाहेर निघून आला. सेलमध्ये केमिकल विघटनाची क्रिया सुरू झाल्याने त्याच्या बाहेरील बाजूस लालसर रंगाचा विशिष्ट द्रव जमा झाल्याचे दिसून आले. बाळाला अर्धा तास निगराणीत ठेवून सुट्टी देण्यात आली. अशाप्रकारे बाळाला कुठलीही भूल, सर्जेरी न करता अत्यल्प खर्चात अन्ननलिकेत अडकलेला बटन बॅटरी सेल काढून पुढील धोक्यातून मुक्त करण्यात डॉक्टर सचिन सांगळे यांना यश आलं.

हेही वाचा : पुढचे पाच दिवस कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाचे, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.