Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच

सध्या उदयनराजे एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी धूम स्टाईलमध्ये सुस्साट वेगात जिप्सी चालवली आहे. उदयनराजेंच्या या जिप्सी राईडचा व्हिडीओ साताऱ्यातील असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच
UDYANRAJE BHOSALE
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 12:15 AM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे राजकीय नेते म्हणून आपल्याला सर्वपरिचित आहे. मात्र, फक्त एक राजकीय व्यक्ती एवढीच त्यांची ओळख नाहीये. त्यांच्या काही सिग्नेचर स्टाईल्समुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतात. सध्या उदयनराजे एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी धूम स्टाईलमध्ये सुस्साट वेगात जिप्सी चालवली आहे. उदयनराजेंच्या या जिप्सी राईडचा व्हिडीओ साताऱ्यातील असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. (Udayanraje Bhosale riding Jeep in Satara Jalmandir palace video went viral on social media)

उदयनराजेंच्या जिप्सी राईडचा व्हिडीओ व्हायरल

उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइविंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय भारदस्तपणे आणि थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत त्यांच्या चाहत्यांसोबतच इतरांनाही आवडते. उदयनराजे यापूर्वी बुलटेवर फेरफकटा मारताना दिसलेले आहेत. ते कधीकधी एखादी चारचाकी गाडीसुद्धा सुस्साट वेगाने चालवतात. सध्या त्यांचा एक जिप्सी चावलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुस्साट वेगात जिप्सी राईड

या या व्हिडीओमध्ये खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातील आपल्या जलमंदिर या निवासस्थाच्या परिसरात जिप्सी चालवत आहेत. अत्यंत्य वेगात गाडी चावलत असल्यामुळे जिप्सीच्या सायलेन्सरचा आवाज हवेला कापत असल्याचा भास हा व्हिडीओ पहाताना होतोय. उदयनराजेंची गाडी चावलण्याची पद्धत ही काळजाचा ठोका चुकवणारी आहे. त्यांनी जलमंदिर ते राजवाडा या मार्गावर जिप्सी राईड केली.

उदयनराजेंनी यापूर्वीसुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुलेट चावलेली आहे. त्यांच्या या बुलेटराईडचाही व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. आताही उदयनराजेंच्या जिप्सी राईडची चांगलीच चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ :

मराठा आरक्षणावरुन उदयनराजे आक्रमक

दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले हे वेळोवेळी आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. “मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे,” असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी 17 जूनला ठाकरे सरकारला दिला होता.

इतर बातम्या :

प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे खळबळ, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

जे मुख्यमंत्र्यांना जमले ते अजित पवारांना का नाही? आधी ‘ग्यान’ दिले, नंतर त्यालाच हरताळ?

प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

(Udayanraje Bhosale riding Jeep in Satara Jalmandir palace video went viral on social media)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.