AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: उदयनराजे भोसलेंकडून युवकांना व्यायामाचे धडे, साताऱ्यात विकासकामांचा धडाका सुरुच

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या साताऱ्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा शहरात विकासकामांचा धडाका सुरु आहे.

Video: उदयनराजे भोसलेंकडून युवकांना व्यायामाचे धडे, साताऱ्यात विकासकामांचा धडाका सुरुच
उदयनराजे भोसले
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 8:13 AM
Share

सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या साताऱ्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा शहरात विकासकामांचा धडाका सुरु आहे. सातारा नगरपालिकेत उदयनराजेंच्या नेतृत्वातील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले सध्या साताऱ्यात तळ ठोकून आहेत. साताऱ्यातील फुटका तलाव येथील ओपन जिम चे उदघाटन करताना स्वतः मशीन वर व्यायाम करून युवकांना व्यायाम करण्याचा अनोखा संदेश दिला. उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

उदयनराजे भोसलेंकडून विकासकामाचा धडाका सुरुच

सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांचा हस्ते शहरातील विविध विकास कामाचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात येत आहे. साताऱ्यातील फुटका तलाव येथील ओपन जिमचे उदघाटन करताना स्वतः मशीन वर व्यायाम करुन उदयनराजे भोसले यांनी युवकांना व्यायाम करण्याचा अनोखा संदेश दिला. उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीपूर्वी उदयनराजे साताऱ्यात सक्रिय झाले आहेत.

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंची सत्ता

सातारा नगरपालिकेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत मतदारांतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. 2016 च्या निवडणुकीत देखील मनोमिलन तुटलं होतं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून नवख्या माधवी कदम यांना संधी देण्यात आली होती. तर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून वेदांतिकाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. माधवी कदम यांच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले यांनी सातारा ढवळून काढला होता. अखेर माधवी कदम विजयी झाल्या. तर, सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले होते. तर, भाजपचे 6 नगरसेवक त्या निवडणुकीत विजयी झाले होते. नगरविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या.

साताऱ्यात तिरंगी लढतीची शक्यता

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे साताऱ्यात आता दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्या निवडणूक लढवतील. साताऱ्यात गेल्यावेळी निवडून आलेले भाजप नगरसेवक कोणत्या आघाडीच्या बाजूनं जाणार हे पाहावं लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्यातरी सातारा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

इतर बातम्या:

आम्ही विकासाचा शब्द देतो आणि पाळतोही, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन काम करणार का? उदयनराजेंचं तीन शब्दात उत्तर, साताऱ्यात नेमकं काय घडणार?

Udyanraje Bhonsle inaugurate open gym in Satara and gave training to youth video viral

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.