AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तळपत्या उन्हात वॉटर ATM बंद; चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी पळापळ

नातेवाईक जागा मिळेल तिथे पथारी पसरून आल्या बिकट प्रसंगाचा सामना करत आहेत. | Chandrapur Water ATM

तळपत्या उन्हात वॉटर ATM बंद; चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी पळापळ
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Apr 22, 2021 | 12:44 PM
Share

चंद्रपूर: दुष्काळात तेरावा महिना काय असतो, या परिस्थितीचा अनुभव सध्या चंद्रपुरात येत आहे. चंद्रपूरच्या मुख्य शासकीय कोविड रुग्णालयात (Covid hospital) असुविधांचा डोंगर बघायला मिळत आहे. चंद्रपूरच्या एप्रिल महिन्यातील तळतळत्या उन्हात इथले वॉटर ATM बंद झाले आहे. पाण्याच्या घोटासाठी रुग्ण- नातेवाईक यांना तासातासाला पदरचे पैसे खर्च करावे लागत आहेत. (Water ATM in Chandrapur closed due to Coronavirus)

गडचिरोली, नागपूर, तेलंगणा, यवतमाळ येथून स्वतःच्या वाहनाने उपचाराच्या आशेने जिल्हा मुख्यालयी आलेले रुग्ण आणि नातेवाईक जागा मिळेल तिथे पथारी पसरून आल्या बिकट प्रसंगाचा सामना करत आहेत. त्यांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. बेडच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण रुग्णवाहिका-बेड-औषधे-इंजेक्शन- विसावा आणि पाणी या असुविधांनी त्रासले आहेत. डझनावारी रुग्ण स्वतःच्या वाहनात कोविड रुग्णालयाबाहेर बेडसाठी प्रतीक्षा करत आहेत.

एकीकडे बेड मिळविण्यासाठी मारामार तर पाण्यासाठी दाहीदिशा फिरताना दिसत आहेत. एरवी चंद्रपूरच्या उन्हाळ्यात शहरात विविध सामाजिक संस्थांच्या पाणपोया जागोजागी सुरू झालेल्या असतात. सध्या मात्र कोरोनाच्या दहशतीने समाजसेवा बॅकफूटवर गेलेली दिसत आहे. रुग्ण आणि नातेवाईक प्रशासनाएवढेच हतबल झाले आहेत.

हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले

बेड न मिळाल्यामुळे एका तरुणाने नाशिकमधील रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली आहे. पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने अखेरचा श्वास घेतल्याने उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. (Nashik man dies outside Chandvad Hospital in front of wife)

अरुण माळी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुणला त्रास होऊ लागल्यानंतर पत्नी सुरेखा त्याला घेऊन रुग्णालयात आली होती. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन चेक केले. अरुणच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, शंभरीपार वृद्धेच्या पार्थिवाला सूनेकडून मुखाग्नी

VIDEO | हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले

VIDEO | अहमदनगरमध्ये तहसीलदार ज्योती देवरेंकडून कोरोनाबाधित वृद्धावर अंत्यसंस्कार

(Water ATM in Chandrapur closed due to Coronavirus)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.