VIDEO | जेव्हा नालीतून वाहतात पाचशेच्या नोटा, पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे वाहणाऱ्या नोटांपैकी अनेक नोटा ह्या फाटलेल्या किंवा वाळवीणे खाल्लेल्या आहेत. पोलीस या नोटांसंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

VIDEO | जेव्हा नालीतून वाहतात पाचशेच्या नोटा, पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
जेव्हा नालीतून वाहतात पाचशेच्या नोटा


लातूर : जिल्ह्यातील उदगीर शहरात पाचशे रुपयांच्या असंख्य नोटा नालीमध्ये वाहून जात असल्याची घटना समोर आली आहे. या नोटा कोणी आणि कशासाठी नालीमध्ये फेकून दिल्या हे अद्याप कळू शकले नाही. मात्र नागरिकांनी या नोटा नालीमधून काढून पळ काढला. उदगीर शहरातील बिदर रोडवर रघुकुल मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यलया जवळून वाहणाऱ्या नालीमध्ये आज सकाळीच पाचशे रुपयांच्या नोटा वाहत होत्या.

बातमी कळताच नागरिकांची गर्दी

ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी या नोटा नालीतून काढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नालीतील काही नोटा ताब्यात घेत त्या खऱ्या आहेत कि खोट्या याची शहनिशा केली. तपासल्यानंतर या नोटा खऱ्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या नोटा नालीमध्ये कोणी आणून टाकल्या याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे वाहणाऱ्या नोटांपैकी अनेक नोटा ह्या फाटलेल्या किंवा वाळवीणे खाल्लेल्या आहेत. पोलीस या नोटांसंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

उत्तर प्रदेशात 25 कोटी केले वसुल

जुन्या नोटा बंद झाल्यावर मेरठ व्यावसायिक संजीव गुप्ता यांनी बर्‍याच लोकांकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा गोळा केल्या आणि संधी पाहून या नोटा नव्या नोटांमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात झाली. पण ही बाब आयकर विभागाच्या रडारवर आली. या व्यावसायिकाने 25 कोटींच्या सर्व जुन्या नोटा गोळा केल्यात. परंतु या प्रकरणाचा तपास केला गेला आणि या सर्व नोटा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसरीकडे प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू झाली. आता प्राप्तिकर विभागाने या व्यावसायिकावर 42 कोटींचा कर लादला.

इतर बातम्या

Sulak Canyon Video | 6 हजार फूट उंचावर महिला झोपाळ्यात बसल्या, अचानक साखळी तुटली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

बनावट सिमकार्डांद्वारे फसवणूक करणे कठीण, सरकारकडून केंद्रीय डेटाबेस तयार, नवीन यंत्रणा सज्ज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI