सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुतीराव किंन्हाके यांना सॅल्युट मारला.

सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?
यशोमती ठाकूर

अमरावती: पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुतीराव किंन्हाके यांना सॅल्युट मारला. मारुतीराव किन्हाके आज महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. यशोमती ठाकूर यांनी त्यांचं औक्षण करुन शाल व श्रीफळ देत सत्कार केला.

यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती ठाकूर यांच्या वाहनाचं ते राज्यभरात चालक म्हणून ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार यशोमती ठाकूर यांनी केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना मंत्री ठाकूर यांनी चक्क सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मंत्र्यांच्या सॅल्युटला मारुतीराव किन्हाके यांनी सॅल्युट केला.

“मारोतीभाऊ किन्हाके,माझ्या शासकीय पोलीस ताफ्यातील वाहन चालक! आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत.मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकले ते मारोतीभाऊ यांच्यासारख्या सहकाऱ्यांमुळे. आज त्यांचं औक्षण करून शाल व श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला”, असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

यशोमती ठाकूर यांचं ट्विट

पावसामुळं अजित पवार यांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला

जून महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयारी केली होती. मात्र, अजित पवार आण राजेश टोपे दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. पोलीस कर्मचारी मंत्रिमहोदयांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे सरसावले होते. अजित पवार यांनी गाडीतून उतरताच पोलिसांना भिजू नका असं सांगत गार्ड ऑफ ऑनर नाकारला होता. अजित पवार हे आपली धडाडीची कार्यशैली आणि रोखठोक बोलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी दाखवलेली माणुसकीही चर्चेचा विषय ठरली होती.

इतर बातम्या:

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

Yashomati Thakur salutes Assistant Sub Inspector Marutirao Kinhake on his retirement day

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI