दारु पिण्याची हुक्की आल्याने सॅनिटायझर प्यायले, 6 जणांचा मृत्यू; यवतमाळ हादरले

दारु पिण्याची हुक्की आल्याने सॅनिटायझर प्यायले, 6 जणांचा मृत्यू; यवतमाळ हादरले
सांकेतिक फोटो

दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Yavatmal 6 People died due to drink sanitizer)

Namrata Patil

|

Apr 24, 2021 | 12:19 PM

यवतमाळ : दारुची लत भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Yavatmal 6 People died due to drink sanitizer)

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये दारुची दुकान बंद आहेत. त्यामुळे दारुची लत भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले आहेत. यात 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. यातील सहा मृतांची नावे समोर आली आहेत.

मृतांची नावे

दत्ता लांजेवार नूतन पाथरटकर गणेश नांदेकर संतोष मेहर सुनील ढेंगळे गणेश शेलार

दरम्यान यातील तीन जणांचा घरीच मृत्यू झाला होता. तर इतर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे समोर येत आहे. (Yavatmal 6 People died due to drink sanitizer)

संबंधित बातम्या : 

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार; 10 जणांचं पथक, 10 रुग्णवाहिका सज्ज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें