पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मनाई असताना धरणात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

मित्रांसोबत फिरायला आलेल्या 17 वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यृ झाल्याची घटना घडली आहे.

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मनाई असताना धरणात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू
palghar boy drowned

पालघर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यृ झाल्याची घटना घडली आहे. सफाळे जवळील रोडखड पाडा धरणात युवकाचा मृत्यू झाला. तन्मेष विकास तरे असं पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील एडवन येथील रहिवाशी होता. (young boy drowned in dam of Rodkhad Pada Palghar)

तन्मेष पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला

मिळालेल्या माहितीनुसार आज (1 ऑगस्ट) सकाळी तन्मेष तरे हा काही मुला-मुलींसोबत फिरायला गेला होता. त्याच्यासोबत मुला-मुलींचा मोठा ग्रुप होता. यावेळी रोडखड धऱणाजवळ आल्यानंतर हा ग्रुप मस्ती करत होता. यातच काही जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. तन्मेष तरे हासुद्धा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

तन्मेषला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला

यावेळी धरणात पोहत असताना त्याला पाण्याच अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडायला लागला. ही घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. तन्मेषच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर धरणाजवळ काही लोकांनी धाव घेतली. या लोकांनी तन्मेषला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडून तन्मेषचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून धरण, नद्यांकडे पर्यटकांची धाव

दरम्यान, ही घटना समजताच पोलीस आणि पोलीस मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तन्मेषचा शोध घेतला. तसेच त्याचा मृतदेह बाहेर काढला. तन्मेषचा असा अचानकपणे मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील धबधबे, धरणं, नद्या पूर्णपणे भरल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश आहेत. मात्र, असे असूनदेखील काही अतिउत्साही तरुण-तरुणी या आदेशाकडे दुर्लक्ष करत असून धरण आणि नद्यांकडे जात आहेत. ज्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

इतर बातम्या :

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

(young boy drowned in dam of Rodkhad Pada Palghar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI