AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आज गर्दी कमी, उद्या येऊया..”; पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवादी काय म्हणाले? जालन्यातील तरुणाचा खुलासा

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबद्दल जालन्यातील आदर्श राऊत या तरुणाने मोठा खुलासा केला आहे. आदर्श आणि त्याचे कुटुंबीय काश्मीरला फिरायला गेले होते. हल्ल्याच्या एक दिवस आधी आदर्श बैसरन पठारावर गेला होता. तिथे एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधला होता.

आज गर्दी कमी, उद्या येऊया..; पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवादी काय म्हणाले? जालन्यातील तरुणाचा खुलासा
जालन्यातील तरुणाने सांगितली घटनाImage Credit source: ANI
| Updated on: Apr 30, 2025 | 11:43 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जालन्यातील राऊत कुटुंब थोडक्यात वाचलं. जालन्यातील राऊतनगरमध्ये राहणारे संजय राऊत हे त्यांचा मुलगा आदर्श आणि पत्नीसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. 21 एप्रिल रोजी हे तिघं पहलगाममध्ये होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 22 एप्रिल रोजी बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. ज्यादिवशी राऊत कुटुंबीय पहलगाममध्ये होते, तेव्हा एकाने “तू काश्मिरी दिसत नाहीस, हिंदू आहेस का” असा प्रश्न विचारल्याचा दावा आदर्शने केला आहे. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाच्या स्केचशी त्याचा चेहरा मिळताजुळता असल्याचंही त्याने म्हटलंय.

21 एप्रिल रोजी आदर्श एकटाच घोडेस्वारी आणि फिरण्यासाठी बैसरनला गेला होता. तिथे एका मॅगीच्या स्टॉलवर तो थांबला असता एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधला होता. त्या व्यक्तीने आदर्शला विचारलं, “तुम्ही काश्मिरी दिसत नाही, तुम्ही हिंदू आहात का?” या प्रश्नावरून आदर्शच्या मनात शंका उपस्थित झाली आणि त्याने फक्त इतकंच उत्तर दिलं की, “मी इथलाच आहे.” तसंच आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया, अशी त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत चर्चा केल्याचाही दावा आदर्शने केला आहे. यानंतर तो तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी राऊत कुटुंबीय श्रीनगरला पोहोचले होते. तेव्हाच बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

ज्या व्यक्तीने आदर्शशी संवाद साधला, ती व्यक्ती दहशतवादी हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या स्केचशी मिळतीजुळती असल्याचं आदर्शने म्हटलंय. या संशयावरून त्याने थेट NIA ला ई-मेलकरून माहिती दिली आहे. बैसरनमध्ये दहशतवादी 21 एप्रिल रोजीच हल्ला करणार होते, परंतु त्यादिवशी पर्यटकांची गर्दी कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केला. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदर्शचे वडील संजय म्हणाले की, “ज्याठिकाणी हल्ला झाला, तिथे कोणतीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. जर सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित हल्ला टाळता आला असता.”

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील रहिवाशी होते.

Follow Us
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट