अजित पवारांच्या सभेत स्टेजवर उपस्थिती, पंढरपुरातील नेत्याचं कोरोनामुळे निधन

पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pandharpur Former ZP Member died due to corona)

अजित पवारांच्या सभेत स्टेजवर उपस्थिती, पंढरपुरातील नेत्याचं कोरोनामुळे निधन
Pandharpur Former ZP Member Babasaheb Bhimrao Patil death
Namrata Patil

|

Apr 16, 2021 | 7:04 AM

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत त्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pandharpur Former ZP Member Babasaheb Bhimrao Patil died due to corona)

अजित पवारांच्या जाहीर सभेला उपस्थिती

काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारसभेला अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते.

उपचारादरम्यान मृत्यू

9 एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी आरोग्य तपासणी केली होती. तसेच त्यांना कोरोनाची लक्षण दिसत असल्याने पाटील यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. पाटील यांना या सभेच्या वेळी त्रास जाणवत होता. ही सभा संपल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री पाटील यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत 40 जण बाधित 

तर दुसरीकडे याच बोराळे गावात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहेत. बोराळे गावात आतापर्यंत 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नागरिक हे अजित पवारांच्या जाहीर सभेत सहभागी झाले होते. यामुळे बोराळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.  (Pandharpur Former ZP Member Babasaheb Bhimrao Patil died due to corona)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक  

दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना रिंगणात उतरवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

(Pandharpur Former ZP Member Babasaheb Bhimrao Patil died due to corona)

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादीचे नेते बाजार बुणगे, आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे, बलात्कारी; पडळकर, दरेकर बरसले

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें