...तर ऊसतोड कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावं, पंकजा मुंडेंचं आवाहन

ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांची दरवाढ मिळायला हवी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

...तर ऊसतोड कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावं, पंकजा मुंडेंचं आवाहन

बीड : ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन पंकजा मुंडे यांनी कामगारांनी आता ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन केले आहे. (Pankaja Munde Appeal Sugarcane Worker)

भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून ठेवण्यात आला होता. या सत्कार समारंभामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या दरवाढीबाबत आपली भूमिका जाहीर केली.

“कारखानदारांनी ऊसतोड कामगारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही. आता एवढी तरी दानत ठेवावी, अशी अपेक्षा या वेळी पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केली. ऊसतोड कामगारांच्या संपात राजकारण होत आहे, त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याने हा विषय आता इथेच संपवावा आणि कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावे”, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत दुर्गाष्टमीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी नुकतीच केली होती, परंतु यात तोडगा न निघाल्याने त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार जर 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कामगारांनी ऊसतोडीसाठी निघायला हरकत नाही, असं पंकजा म्हणाल्या.

राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणे गरजेचं असल्याचं पंकजा म्हणाल्या. राज्यातल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. पण कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण चाललं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

वंचितचा मेळावा, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना वाढीव दर मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारलाय. उद्या पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी वंचितने मेळावा आयोजित केलाय. ऊसतोड मजुरांबाबत उद्या प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतील याकडे राज्याचे लक्ष वेधले असतानाच आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांनी मजुरांचा ऊसतोडणीसाठी निघावं असं आवाहन केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या वंचितच्या ऊसतोड मजुरांच्या मेळाव्याला किती ऊसतोड मजूर उपस्थित राहतील हा प्रश्न आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच ऊसतोड मजुरांचा प्रश्न हाती घेतल्याने तसंच पंकजा मुंडेंनी आदल्या दिवशीच मजुरांना कामावर जाण्याचे आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होत आहे.

(Pankaja Munde Appeal Sugarcane Worker)

संबंधित बातम्या

ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला नेतेच जास्त येऊ नये; पंकजा मुंडेंचा आंबेडकरांना टोला

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा; अन्यथा आंदोलन अटळ : पंकजा मुंडे

ऊसतोड कामगार, मुकादम अन् वाहतूकदारांना जिल्ह्यांतच अडवा, प्रकाश आंबेडकरांचे वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *