गहिनीनाथगडावर मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर, ‘आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात’, पंकजांचे वक्तव्य

समाजापुढे सहज आदर्श निर्माण होत नाही. खूप त्याग निर्माण करावा लागतो. खूप बलिदान करावं लागतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या (Pankaja Munde speech on Gahininath Gad).

गहिनीनाथगडावर मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर, 'आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात', पंकजांचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 5:09 PM

बीड : पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तिथे आज (5 जानेवारी) महापूजेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना पंकजा मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या कार्याची आठवण करुन दिली. यावेळी धनंजय मुंडे हेदेखील मंचावर उपस्थित होते (Pankaja Munde speech on Gahininath Gad).

“आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात. आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण माणूस म्हणून जन्म घेतला असल्याने आपल्या समोर काही आदर्श असतो आणि तो आदर्श बघून आपणही आदर्श निर्माण करतो. वामनभाऊंचा आदर्श आपल्यासमोर आहे. सहज आदर्श निर्माण होत नाही. खूप त्याग निर्माण करावा लागतो. खूप बलिदान करावं लागतं. खूप कठीण परिस्थीतून जगावं लागतं. तेव्हा लोकं त्यांच्या मृत्यूनंतर वर्षोंवर्ष त्यांची आठवण काढतात. मग ते नेते असतील किंवा संत. असंच गोपीनाथ मुंडे यांची आठवण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट समाजाला समर्पित करावे लागतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“गहिनीनाथगडाची अनेक वर्षांची परंपरा आहे. आज मौल्यवान असा क्षण आहे. हा क्षण आपल्याकडून चुकू नये या भावनेने मी या मंचावर आलेली आहे. विठ्ठल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वजण वामनभाऊच आहेत. तुमचा दर्शनाचा मला आनंद झाला. तुमच्या दर्शनासाठीच मी इथे आले”, असं पंकजा यांनी सांगितलं (Pankaja Munde speech on Gahininath Gad).

“काय बोलावं कळत नाही! पालकमंत्री असताना कुणी काय दिलं ते विठ्ठल महाजारांनी सांगितलं. आज मी पहिल्यांदा भक्त म्हणून आली आहे. पालकमंत्री असताना आपण काहितरी दिलं पाहिजे, काहितरी कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे, अशी भावना असते. मात्र, आज मी केवळ भक्त म्हणून आलेली आहे. आज द्यायचं प्रेम आणि घ्यायचा आशीर्वाद आहे. या पलिकडे आणखी काही नाही”, असंदेखील त्या म्हणाल्या.

“भगवान बाबा आणि वामनभाऊ हे गुरुबंधु आहेत. आपण कोण आहोत? आपण माणसं आहोत. आपण राजकारणात आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं, शक्तीचं विभाजन करतो. आपण लोकांचं विभाजन करतो. पण शेवटी सर्वजण एक आहोत”, असं पंकजा म्हणाल्या.

“माणसाचा जन्म काहीतरी करुन दाखवायचं आहे. परोपकाराने काम करायचं. संस्काराने काम करायचं. क्षमा ज्याच्या मनामध्ये आहे, त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची वासना कधीही जागा ठेवू शकत नाही”, असं पंकजा म्हणाल्या.

“कशीही परिस्थिती आली तरी आपण आपला संयम सोडायचा नाही. कशाही परिस्थितीत आपण तोल सोडायचा नाही आणि क्षमाभाव ठेवायचा. आपल्याशी कोणी चांगलं वागलं तर त्याला आशीर्वाद द्या, हीच संतांची शिकवण आहे. त्यामुळे आपण फक्त वामनभाऊंचं दर्शन घ्यायचं नाही. तर त्यांच्या जीवनातील संघर्षाची ज्योत आपल्या मनात तेवत ठेवायची”, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा : धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक, आता गहिनीनाथगड येथे महापुजा

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.