AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parli : परळीचं बसस्थानक मोजतय शेवटच्या घटका, जागोजागी खड्डे अन् मोकाट प्राण्यांचा ताप

रविवारी परळीमध्ये (Parli) जोरदार पाऊस (rain) पडला.  या पावसामुळे परळीच्या बस स्थानकाला (bus station) बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.

Parli : परळीचं बसस्थानक मोजतय शेवटच्या घटका, जागोजागी खड्डे अन् मोकाट प्राण्यांचा ताप
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 2:27 PM
Share

परळी : रविवारी परळीमध्ये (Parli) जोरदार पाऊस (rain) पडला.  या पावसामुळे परळीच्या बस स्थानकाला (bus station) बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.  मोकाट जणावरांचा ताप देखील वाढला आहे.  खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. या बस स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथ मंदिर देखील इथेच असल्याने नेहमीच परळीत भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते.  राज्यासह परराज्यातील प्रवासी इथेच उतरतात. असं असताना इथे सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. मात्र या बस स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. बसस्थानकात असलेल्या असुविधांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसस्थानकांची दुरुस्ती कधी करण्यात येणार याकडे आता प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.

धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ

दरम्यान दुसरीकडे परळी हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ मानला जातो. राज्याच्या राजकारणात दोन्ही भावा बहिणेचे मोठे वजन आहे. मात्र असे असून देखील परळी शहरातील बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यापूर्वी दोनवेळा बांधकामाचे उद्घाटन झाले मात्र ते कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा हा मतदाससंघ असल्याने किमान शहरात तरी सर्व सोईसुविधा असाव्यात अशी अपेक्षा जनसामान्याची असते. मात्र इथे चित्र उलटे आहे. बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून,  असुविधेमुळे इथे उतरणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसस्थानकात जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

बसस्थानक परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य

बसस्थानक परिसरात खड्डेच-खड्डे पडल्याचे पहायला मिळत आहेत.  या खड्ड्यांमुळे बसस्थानकात बस पार्क करताना चालकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने परळी बसस्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. तसेच परिसरात मोकाट प्राण्यांचा मुक्त वावर असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या बसस्थानकाची दुरुस्ती कधी होणार याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.