AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापाने 70 हजार कोटी पचवले आणि पार्थ पवारने…. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित जमीन व्यवहारामुळे राजकारण तापले आहे. मुंढवा येथील सुमारे ४० एकर महार वतन जमीन पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीने अवघ्या ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे,

बापाने 70 हजार कोटी पचवले आणि पार्थ पवारने.... लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत
| Updated on: Nov 09, 2025 | 12:16 PM
Share

पुणे येथील मुंढवा परिसरातील ४० एकर महार वतन जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी (Amedia Enterprises LLP) या कंपनीने कथितरित्या ही जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीचे बाजारमूल्य सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. महार वतन जमीन सरकारी मालकीची असून ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. आता या प्रकरणावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणावरून अजित पवार कुटुंबावर टीका केली आहे.

पार्थ पवार काय म्हणाले?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली जात आहे. लक्ष्मण हाके यांनी या कथित घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनवण्याची उपहासात्मक मागणी करण्यात आली आहे. तसेच आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात, असा टोलाही लगावण्यात आला.

१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

उदा. -एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये. -शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये. -सरकारी खात्याची जमिन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी. -भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्क्ष करावे.

प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातता जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमिन खरेदीचा घोटाळा करावा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम,तओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमिन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रा पुढे येईल असे वाटत नाही, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

जमीन खरेदीची प्रक्रिया रद्द

दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जमीन खरेदीची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. व्यवहार करताना पार्थ पवार यांना ती जमीन सरकारी आहे याची कल्पना नव्हती, असा खुलासा त्यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.