AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! भर समुद्रात थरार… बोटीचे दोन तुकडे, जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवले; चालकाचे आरोप काय?

गेटवे हून एलिफंटा येथे निघालेल्या प्रवासी बोटीचा बुचर आयलँड येथे अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे बचाव मोहिम सुरु असताना या संदर्भात शेकापचे नेते जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे.

सर्वात मोठी बातमी ! भर समुद्रात थरार... बोटीचे दोन तुकडे, जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवले; चालकाचे आरोप काय?
| Updated on: Dec 18, 2024 | 8:14 PM
Share

मुंबईतील गेटवेहून एलिफंटा येथे प्रवाशांना घेऊन निघालेली प्रवासी बोट उरण कारंजा येथे समुद्रात बुडाल्याची घटना घडल्यानंतर आता या बोटीच्या चालकाने या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने ती बुडाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एलिफंटा येथे दुपारी अडीच नंतर आमची नीलकमल बोट निघाली असता तिला बुचर आयलँड येथे नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

राजेंद्र परते काय म्हणाले

या संदर्भात नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी माहिती देताना सांगितले की आमची रोज अडीच वाजता एलिफंटाला जाते. आजही जात होतो. तिकडे नेव्हीची स्पीड बोट आहे. या बोटीने राऊंड मारला. नागमोडी होऊन गेली. आणि तिने आमच्या बोटीला जोराने धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. नेव्हीची स्पीड बोट होती. एकूण ८० प्रवासी बोटीत होते. किती जणांना बाहेर काढलं माहीत नाही. ५६ लोक जेएनपीटीत आहे. काही नेव्हीच्या बोटीने गेले. काही गेटवेच्या बोटीने आणले आहेत असे बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असून बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बचावकार्याला वेग

मुंबईत एलिफंटा परिसरात सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे.  त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.