AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोरीवर ग्लूकोजची बॉटल बांधून रस्त्यावरच शेकडो रुग्णांना लावली सलाईन, महाराष्ट्रातील घटनेचा video व्हायरल

food poisoning by mahaprasad | घटना घडल्यावर बाधीत लोकांना रात्रीच बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले.

दोरीवर ग्लूकोजची बॉटल बांधून रस्त्यावरच शेकडो रुग्णांना लावली सलाईन, महाराष्ट्रातील घटनेचा video व्हायरल
| Updated on: Feb 22, 2024 | 8:35 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा, दि. 22 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. रस्त्यावर दोरी बांधून त्याला ग्लूकोजची बॉटल लावून रुग्णांना सलाईन दिली जात आहे. डॉक्टर रस्त्यावर बसून उपचार करत आहेत. हॉस्पिटलमध्ये फरशीवर रुग्ण झोपले आहेत. बुलढाणामधील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी सुमारे ५०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली. त्यानंतर मोठ्या संख्येने रुग्ण आल्यामुळे जागा नव्हती. अखेर रस्त्यावर उपचार सुरु करण्यात आले.

काय झाला प्रकार

खापरखेड सोमठाणा गावात विठ्ठल – रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० पेक्षा जास्त महिला सह पुरूषांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात व्यवस्थाच नसल्यामुळे रस्त्यावर उपचार सुरु करण्यात आले. बाधीत लोकांवर रात्रीच उपचार करून 100 चे वर नागरिकांना घरी सोडण्यात आले होते. तर 200 चे वर लोकांवर उपचार सुरू करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकारी नव्हते

घटना घडल्यावर बाधीत लोकांना रात्रीच बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. तर परिसरातील मेहकर, लोणार येथील रुग्णालयात ही काही बाधीत रुग्ण उपचारासाठी हलविले.रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला.

आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट

आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना उलट्या, मळमळ, संडासचा त्रास झाला. पोलिस आणि महसूल विभागाचे लोकांनी बाधीत लोकांना उपचारासाठी हलविले. मात्र यावेळी डॉक्टर नसल्याने ग्रामस्थामध्ये संताप पाहायला मिळाला. सोशल मीडियावर अनेक जण या व्हिडिओवर संताप व्यक्त करत आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.