AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित दादांनी डाव टाकला, भाजपसह शिवसेनेलाही दणका, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेट!

PCMC Election : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

अजित दादांनी डाव टाकला, भाजपसह शिवसेनेलाही दणका, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेट!
PCMC ElectionImage Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 16, 2025 | 9:34 PM
Share

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी लागणार आहे. अशातच आज भाजपच्या स्वबळाच्या घोषणेच्या एका दिवसांनंतर अजित पवारांनी आपली पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पिंपरी चिंडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट यांच्यासह शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढली आहे. तर भाजप आणि शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबत अनेक माजी भाजपसह इतर पक्षांचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज झालेल्या पक्षप्रवेशाबाबत माहिती देताना अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी म्हटले की, ‘आज माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव कामी येईल आणि त्यातून जनसेवा घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती?

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची नुकतीच बैठक झाली. नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दादांना देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात असं सांगणारं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद