लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा; बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने घेणे आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

  ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा; बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने घेणे आवश्यक - उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 4:18 PM

पुणे – जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या शंभर टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत तर दुसरी मात्रादेखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विधानभवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते.

खबरदारी घेणे आवश्यक

ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा. विशेषत: कमी लसीकरण झालेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ओमीक्रॉनची स्थिती

महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा बाधित10  रुग्ण असून त्यापैकी 7 पुणे जिल्ह्यात आहे. हे सर्व रुग्ण लक्षणे विरहीत अथवा कमी लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. मागील 10 दिवसात 8 लक्ष लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी पहिली मात्रा 33 टक्के तर 67  टक्के दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याने लसीकरणात 1  कोटी 38  लाखाचा टप्पा पार केला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या 19हजार 174 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्याबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

बूस्टर डोसचा निर्णय देश पातळीवर घ्या

बूस्टर डोस संदर्भात आज झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम आम्ही दोन्ही डोस कसे देता येतील या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. कारण दोन्ही डोस घेतलेल्यांना या विषाणूचा फार काही त्रास होत नसल्याचे आढळून आले आहे. तर काही प्रकरणात ज्या भागात बूस्टर डोस देण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना थोड्या प्रमाणात त्रास झाला. परंतु बुस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देशपातळीवर घेतला गेला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Vinod Kambli | माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा, KYC च्या नावे 1.14 लाखांची लूट

Bipin Rawat Funeral | आठवणींना उजाळा देताना मुलींचे डोळे पाणावले, बिपीन रावत यांची अंत्ययात्रा LIVE

Brigadier LS Lidder | ब्रिगेडियर लिद्दर यांना अखेरचा निरोप देताना पत्नी आणि लेकीलाही अश्रू अनावर! फोटो तुमच्याही डोळ्यांत आणतील पाणी!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.