नोकरी गेली, मग पीएचडी प्राप्त प्राध्यापकाने सुरु केला भंगार व्यवसाय, कंपनी बनवून उलढाल…

business funda | पीएचडी नेटसेटधारक प्राध्यापक नारायण अटकोरे यांनी त्यांच्या शिक्षणाचा कुठलाही बडेजाव केला नाही. कोणाताही व्यवसाय लहान मोठा समजला नाही. एका भंगाराच्या व्यवसायात आपले आयुष्य शोधले. त्यात त्यांना यश आले

नोकरी गेली, मग पीएचडी प्राप्त प्राध्यापकाने सुरु केला भंगार व्यवसाय, कंपनी बनवून उलढाल...
NDA कबाडीवाला कंपनीची निर्मिती नारायण अटकोरे यांनी केली.
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 7:59 AM

जळगाव | दि. 29 फेब्रुवारी 2024 : संकट ही संधी समजून काम करणारे काही जण आहेत. त्यातून मग नवीन यश मिळवल्याची उदाहरणे आहेत. पीएचडी, नेट-सेट असलेल्या प्राध्यापकाची नोकरी गेली. परंतु तो निराश झाला नाही. त्यानंतर त्याने नवीन व्यवसाय सुरु केला. उच्च शिक्षित असताना कोणताही किंतू, परंतु न ठेवता भंगाराचा व्यवसाय सुरु केला. कामाची लाज न बाळगता आधी घरोघरी जाऊन भंगार जमा केले. व्यवसायात यश आले. त्याची कंपनी बनली. त्या कंपनीची उलाढाल आता 35 ते 40 लाखांची झाली आहे. डॉक्टर नारायण अटकोरे यांची ही यशोगाथा आहे.

नवीन कल्पना राबवली

कोरोना काळात अनेकांचे आयुष्य गेले तर काहींचे आयुष्य तारले. जळगावमधील पीएचडी, नेट आणि सेट झालेल्या प्राध्यापक डॉक्टर नारायण अटकोरे यांची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे. कोरोना काळामध्ये महाविद्यालयातील नोकरी गेली. मग निराश न होता अटकोरे यांनी नवीन संधी शोधली. त्यांनी काही दिवस भाड्याची गाडी आणि चालक यांच्या माध्यमातून घरोघरी जावून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय केला. त्यात यश आले. नफा मिळू लागला. शिक्षणाचा फायदा घेत नवीन कल्पना राबवली.

ऑनलाईन सुरु केला व्यवसाय

नारायण अटकोरे यांनी व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर ऑनलाईन पद्धती काम सुरु केले. त्यांनी त्यासाठी वेबसाईट तयार केली. वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांच्या येणाऱ्या फोन कॉलनुसार घरोघरी जाऊन भंगार संकलित केले. आज त्यांची ‘NDA कबाडीवाला’ नावाच्या कंपनीने जळगावमध्ये स्वतःची एक अनोखी ओळख बनली आहे. या माध्यमातून नारायण अटकोरे हे वर्षाला ३० ते ४० लाखांची उलाढाल करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शिक्षणाचा बडेजाव नाही, व्यवसायात यश

पीएचडी नेटसेटधारक प्राध्यापक नारायण अटकोरे यांनी त्यांच्या शिक्षणाचा कुठलाही बडेजाव केला नाही. कोणाताही व्यवसाय लहान मोठा समजला नाही. एका भंगाराच्या व्यवसायात आपले आयुष्य शोधले. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे त्यांची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. भंगार व्यवसायात वर्षाला 35 ते 40 लाखांची उलाढाल त्यांची होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.