पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, अजित पवार हळहळले

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, अजित पवार हळहळले

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांचा आज (31 जुलै) कोरोनामुळे मृत्यू (NCP corporator Javed Sheikh Corona Died) झाला.

Namrata Patil

|

Aug 01, 2020 | 12:30 AM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांचा आज (31 जुलै) कोरोनामुळे मृत्यू झाला. जावेद शेख असे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव असून ते 49 वर्षांचे होते. जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. (NCP corporator Javed Sheikh Corona Died)

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत आहे. तर काही आजी माजी लोकप्रतिनिधींचा कोरोनामुळे मृत्यूही झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

जावेद शेख यांना 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अजित पवार हळहळले

“जावेद शेख यांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हळहळ व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनानं सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावला. सामाजिक क्षेत्रात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे ट्विट अजित पवार यांनी केले.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली

“पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे ट्विट करत खासदार सुप्रिया सुळेंनी शेख यांना श्रद्धांजली वाहिली.

जावेद शेख हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक होते. ते पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी भागातून सलग दोन वेळा निवडून आले होते. (NCP corporator Javed Sheikh Corona Died)

संबंधित बातम्या :

वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, बीडमध्ये कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू

कुलर सुरु करताना शॉक, एकमेकींना वाचवताना तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें