Thane Megablock : मेगाब्लॉक दरम्यान ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी 10 मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा स्टेशन या मार्गावर 15 मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात 205 बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Thane Megablock : मेगाब्लॉक दरम्यान ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन
मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकImage Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 12:39 AM

ठाणे : ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार 5 फेब्रुवारी, 2022 ते सोमवार 7 फेब्रुवारी, 2022 पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक(Megablock) घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणून सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवे(Bus Service)चा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. (Planning of additional bus services from Thane Municipal Corporation’s transport service during megablocks

दिवसभरात 205 बसफेऱ्यांचे नियोजन

रेल्वे विभागाकडून शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी, 2022 रोजी रात्रौ 1.30 वाजल्यापासून ते सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी रात्रौ 1.30 वाजेपर्यत 72 तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी 10 मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा स्टेशन या मार्गावर 15 मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात 205 बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द होणार

मेगाब्लॉकमुळे 350 लोकल आणि लांब पल्ल्याच्या 117 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहेत. 5 फेब्रुवारीच्या रात्री 11.10 वाजल्यापासून सहा फेब्रुवारीच्या पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण येथून सुटमाऱ्या अप मेल एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 6 फेब्रुवारीपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगदा एक मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालवल्या जातील. (Planning of additional bus services from Thane Municipal Corporation’s transport service during megablocks)

इतर बातम्या

Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम; अनधिकृत बॅनर, होर्डिंगवरही कारवाई

TMC Commissioner : ठाण्यातील रस्ता रुंदीकरण कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.