भिडेवाड्यात आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन : छगन भुजबळ

या इमारतीत असलेले व्यावसायिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे. या न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे अशी भावनाही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

भिडेवाड्यात आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal

पुणे- शहरातील मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करत, तेथे पुणे महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्याचे  प्रस्थावित असल्याची माहिती असल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन, या कामास तात्काळ प्रारंभ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा

1848 साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली.

या इमारतीत असलेले व्यावसायिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे. या न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे अशी भावनाही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. या बैठकीस भिडेवाड्यातील गाळेधारक दुकानदार तसेच रहिवाश्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल यावेळी बोलताना भुजबळ यांनी नारायण राणे यांना टोला लागवला आहे. मार्च पर्यंत महाविकास आघाडी सरकार कोसळेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले ‘महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आहे. राणेंचा कुठला आहे मार्च आहे ते शोधावे लागेल. हा मार्च जाऊन पुढचा मार्चही जाईल पाच वर्ष महाविकास आघाडी मजबूत राहील असे त्यांनी म्हटले आहे.

…तरीही सोयाबीनवरच भर, बिजोत्पादनासाठी महाबीजच्या मदतीला कृषी विभागही सरसावला

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत महाराष्ट्रही सतर्क; आफ्रिकन विमानांवर बंदी घाला, राजेश टोपेंचे केंद्राला साकडे

Published On - 5:09 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI