मुलीचे पैसे अडकल्याचा धसका, पीएमसी बँक खातेधारकाच्या आईचा मृत्यू

पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आणखी एक मृत्यू (PMC account holder death solapur) झाला आहे. ही घटना रविवारी (20 ऑक्टोबर) सोलापुरात घडली आहे.

मुलीचे पैसे अडकल्याचा धसका, पीएमसी बँक खातेधारकाच्या आईचा मृत्यू

सोलापूर : पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आणखी एक मृत्यू (PMC account holder death solapur) झाला आहे. ही घटना रविवारी (20 ऑक्टोबर) सोलापुरात घडली आहे. दिवसेंदिवस पीएमसी बँक खातेधारकांच्या मृताच्या (PMC account holder death solapur) संख्येत वाढ होत आहे. सोलापुरातील खाते धारकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भारती सदारांगांनी असं या मृत महिलेचं नाव आहे.

पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस या आकड्यावत वाढ होत असल्यामुळे चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिला भारतीच्या मुलीचे आणि मेहुण्याचे सव्वा दोन कोटी रुपये बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यामुळे भारती फार चितेंत होत्या. त्यामुळे ह्रदय विकाराच झटका आला.

पैसे बुडाल्याने माझ्या मुलीचा संसार उध्वस्त होणार आणि सर्वजण रस्त्यावर येणार, अशी भीती त्यांना वाटत होती. पीएमसी बँकेमुळे भारती यांचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, भारती यांचे पीएमसी बँकेत खाते नव्हते.

दरम्यान, आता पर्यंत चार लोकांचा मृत्यू पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे झाला आहे. यामधील दोघांनाही ह्रदय विकाराचा झटाका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मुलुंडमधील 80 वर्षीय मुरलीधर दर्रा आणि जोगेश्वरी येथील 51 वर्षीय संजय गुलाटी असं ह्रदय विकाराने मृत्यू झालेल्या खाते धारकांचे नाव आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *