#PMkiShaadi | लगीन संजय राऊतांच्या लेकीचं, लग्नपत्रिकेवर लिहिलंय #PMkiShaadi; चर्चा तर होणारच!

मागील अनेक दिवसांपासून पूर्वशी राऊत यांच्या हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. पण सध्या मात्र राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

#PMkiShaadi | लगीन संजय राऊतांच्या लेकीचं, लग्नपत्रिकेवर लिहिलंय #PMkiShaadi; चर्चा तर होणारच!
purvashi raut marriage

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्यात राज्यातील बड्या हस्ती तसेच मोठे राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. पण सध्या मात्र राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

लेकीच्या लग्नाची छापली खास लग्नपत्रिका

संजय राऊत तसेच कुटुंबीय आपल्या कन्येच्या लग्नसोहळ्यात सध्या व्यस्त आहेत. प्रत्यक्ष लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नियोजित वधू आणि वर म्हणजेच पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांच्या चेहऱ्यावरील आनंददेखील ओसंडून वाहत आहे. या लग्न समारंभाला अनेक बड्या, जवळच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी एक खास लग्नपत्रिका छापण्यात आलीय. हीच लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरलीय.

#PMkiShaadi हॅशटॅगची एकच चर्चा

या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असं छापण्यात आलंय. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

purvashi raut marriage invitation

purvashi raut marriage invitation

दरम्यान, राऊत यांच्या कन्येचा लग्नसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी आज (28 नोव्हेंबर) प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्वशी राऊत यांचे पिता संजय राऊत यांच्यासह दोन्ही काकाही भावूक झाल्याचं दिसलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

इतर बातम्या :

Farmer : सरकार अजूनही फसवणूक करत आहे, मुंबईत आल्यानंतर राकेश टिकैत यांची केंद्रावर सरकडून टीका

‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार नक्की येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार’, दरेकरांचा मोठा दावा

सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी पोहोचले नाहीत; 31 पक्षांचे नेते उपस्थित, पेगासस हेरगिरी, महागाई आणि बेरोजगारीवर चर्चेची मागणी


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI