गौतमी पाटील अडचणीत, पोलिसांचे मोठे पाऊल, 10 रुपयांसाठी रिक्षाचालक पहाटे पाचपासून…
Gautami Patil Pune Accident : गाैतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. पुण्यात 30 सप्टेंबर रोजी मोठा अपघात झाला. आता या अपघात प्रकरणात काही मोठे खुलासा होताना दिसत आहेत.

वेळ पहाटे पाचची… 10 रूपयांसाठी पॅसेंजरची वाट पाहत रिक्षाचालक सामाजी मरगळे उभे होते. तेवढ्याच एक भरधाव कार आली आणि तिने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाने तीन पलटी खाल्ला…रिक्षाचालक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला… गाडीतील लोक उतरले आजूबाजुला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत गाडीतून उतरून थेट निघून गेले… परत एक व्यक्ती अपघाताच्या ठिकाणी पोहोचली आणि टोईंग व्हॅन आणून अपघातग्रस्त कार घेऊन निघून गेली. मात्र, तो जखमी रिक्षाचालक कितीतरी वेळ रस्त्यावरच पडून राहिला. रिक्षाला मागून जोराची धडक देणारी ही कार दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून गाैतमी पाटील हिची.
अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यादरम्यानच रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. हेच नाही तर पोलिस गाैतमी पाटीलला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचाही कुटुंबियांनी गंभीर आरोप केला. गाैतमी पाटीलच्या अटकेसाठी कुटुंबियांनी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिस आम्हाला अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत नसल्याचा दावा कुटुंबियांनी केला.
या प्रकरणात रिक्षाचालकाचे नातेवाईक थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचले. यावेळी त्यांनी थेट डीसीपींना फोन लावून कारवाई करण्यास सांगितले. आता पोलिसांनी या अपघात प्रकरणी थेट विशेष पथक तयार केलंय. हेच नाही तर परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. नवले पूल अपघात प्रकरण गाैतमी पाटील हिच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. हेच नाही तर पोलिस अपघातग्रस्त गाैतमी पाटीलची कार उचलण्यासाठी क्रेन कोणी बोलावले याचा शोध घेत आहेत.
अपघातानंतर ही कार काहीवेळ तिथेच होती. मात्र, त्यानंतर क्रेन घेऊन येऊन एक व्यक्ती कार घेऊन गेला. हा अपघात गाैतमी पाटील हिच्या चालकाने केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी एक वेगळाच संशय हा व्यक्त केला आहे. यामुळे गाैतमी पाटील चांगलीच संकटात सापडल्याचे बघायला मिळतंय. आता यासर्व गोष्टींवर गाैतमी पाटील काय खुलासा करते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
